मुंबई

21 दिवसात 82 हजार नागरिकांनी भरला दंड, विनामास्क बाहेर निघाल तर पुढचा नंबर तुमचा

समीर सुर्वे

मुंबई  : मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी फिरत असाल तर जरा विचार करा. एकीकडे कोरोनाची टांगती तलवार तर आहेच आणि दुसरीकडे आतापर्यंत बृहन्मुंबई पालिकेकडून मास्क न  कारवाई करण्यात येतेय.

त्यामुळे आतापर्यंत महापालिकेची तुमच्यावर नजर पडली नसेल पण कधीही तुमच्या खिशला 200 रुपयांची फोडणी बसू शकते. महानगर पालिकेने मास्क न वापरणाऱ्या विरोधात कारवाई अधिक तिव्र केली असून गेल्या 21 दिवसात 82 हजारांहून अधिक जणांकडून 200 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. 

कोविडच्या पार्श्‍वभुमीवर एप्रिल महिन्यापासून राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही राज्य सरकारने दिले होते. मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांकडून पालिका 200 रुपये दंड वसुल करत आहे. 9 एप्रिल ते 21 ऑक्‍टोबरपर्यंत पालिकेने 1 लाख 752 जणांवर कारवाई करुन 2 कोटी 30 लाख 29 हजारांचा दंड वसुल केला आहे.

सुरवातीला नागरीकांना समज देण्यावर पालिकेचा भर होता. मात्र, तरीही नागरिकांच्या वर्तनात बदल होत नसल्याने पालिकेने सक्तीने दंड वसुल करण्यास सुरवात केली. त्यानंतरही अनेक भागांमध्ये विना मास्क लोक रस्त्यांवर दिसत होती. ऑक्‍टोबर महिन्याच्या सुरवातील पालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रोज 20 हजार जणांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यासाठी पोलिसांचीही मदत घेण्याची सुचना केली. 

पालिकेने 1 ते 21 ऑक्‍टोबर दरम्यान 82 हजार जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून 1 कोटी 64 लाख 96 हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

bmc has taken action against more than 82 thousand citizens for not wearing mask

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT