मुंबई

महापौरांनी केली नायर रुग्णालयाची पाहणी; कोरोनाबाधितांशीही साधला संवाद...

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील पालिकेचे नायर रुग्णालय हे आता हळूहळू नॉन-कोव्हिड रुग्णालय झाले आहे. अनेक ओपीडी सोमवारपासून सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नायर रुग्णालयही आता पूर्वपदावर येत आहे. त्याचाच आढावा गुरुवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतला. पेडणेकर यांनी पीपीई किट परिधान करून थेट कोरोना कक्षात जाऊन पाहणी केली. तसेच प्रत्यक्ष कोरोनाबाधितासोबत वैयक्तिकरीत्या संवादही साधला. 

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांबाबतच्या बाह्य सेवा तसेच आपत्कालीन सेवा सुरू करण्यात येत असून त्याचे नियोजन कशा प्रकारे करण्यात येत आहे, याची पाहणी महापौरांनी करून संबंधित डॉक्टरांना मार्गदर्शन केले. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधला. 

रुग्णांशी संवाद साधताना महापौरांनी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचारांबाबत काही प्रश्न विचारले. याठिकाणी देण्यात आलेल्या सोयीसुविधेबद्दल आपण समाधानी आहात का? अशी विचारणा केली असता सर्व जणांनी समाधानी आहेत असे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे डॉक्टर, परिचारिका आपली नीट काळजी घेत आहे ना ? अशी विचारणा महापौरांनी यावेळी रुग्णांना केली असता त्यांनी काळजी घेत असल्याचे महापौरांना सांगितले. 

जोपर्यंत आपला रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत याठिकाणी आपल्याला उपचार घ्यावे लागणार असल्याचे महापौरांनी रुग्णांना सांगितले. तसेच आपण बरे झाल्यानंतर प्लाझ्मासाठी आपण आपले रक्त देण्याची तयारी ठेवावी असे आवाहन महापौरांनी यावेळी केले. जेणेकरून आपल्या रक्तामुळे तीन जणांचे प्राण वाचण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण लवकर बरे होऊन इतरांची सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन महापौरांनी यावेळी केले. 

आता आपण काही रुग्णालये कोव्हिडएवजी हळूहळू नॉन कोव्हिड करतोय. कोव्हिडमध्ये रुग्णालयातील वापरलेले आयसीयू बेड्स किंवा लहान मुलांचे आयसीयू बेड्सचे योग्य पद्धतीने सॅनिटायझेशन झाले पाहिजे. कशाप्रकारे ही सुविधा सुरु केली गेली आहे हे पाहण्यासाठी म्हणून ही भेट होती. 700 बेड्स असलेल्या रुग्णालयाचा संपूर्ण आढावा घेतला. अजूनही कोविडचे रुग्ण आहेत, त्यांना कशा पद्धतीने उपचार मिळतात याचा देखील आढावा घेतला. 
- किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई.

---
संपादन ः ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Favorite Leader : आशा भोसलेंचा आवडता नेता कोण? भारदस्त आवाज असणारा नेता अत्यंत जिवलग मित्र...

Breaking News Live Update: केडीएमसी अग्निशमन दलातर्फे सायकल रैलीच्या माध्यमातून जनजागृती

Asha Bhosle Passes Away: छातीतील इन्फेक्शनमुळे खरंच कार्डियॅक अरेस्ट येतो का? डॉक्टरांनी सांगितलं काय आहे कनेक्शन

फॅनच्या कृतीनं टीम डेव्हिड वैतागला, हातातला फोन घेतला अन्....; विमानतळावरील Video Viral

IPL 2026, LSG vs GT: शुभमन गिलने जिंकला टॉस; गुजरात - लखनौच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय झाले बदल?

SCROLL FOR NEXT