मुंबई

लग्नसोहळे, बार, पबवर पालिकेचं कटाक्षानं लक्ष; मुंबईत आणखी पाच पथके तयार

समीर सुर्वे

मुंबई: लग्नसोहळ्यांपासून बाजार, पब, बारवर नजर ठेवण्यासाठी आता महानगर पालिकेने प्रत्येक प्रभागात पाच पथके तयार केली आहे. मुंबईतील 24 पैकी 16 प्रभागात रुग्णवाढीचा वेग जास्त असल्याने या प्रभागांमधील गृहनिर्माण संकुलांना विशेष सूचना देण्यात आल्या असून स्क्रिनिंगवर भर देण्यात आला आहे.

लग्नसोहळे, बार पबवर महानगर पालिकेने विशेष लक्ष देण्याची सुरुवात केली आहे. यासाठी प्रत्येक प्रभाग स्तरावर हॉटल्स, हॉटेल्सच्या बुकिंगची माहिती मागवून घेतली असून धाडी टाकण्यात येत आहे. आतापर्यंत लग्नसोहळे, बार, पबवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागात दोन पथके तयार करण्यात आली होती. प्रत्येक पथकात चार ते पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. आता अशी पाच पथके तयार करण्यात आली आहे.‘प्रत्येक प्रभागात पाच पथके तयार करण्यात आली आहे', अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश कोकाणी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

मुंबईतील 24 प्रभागांपैकी 16 प्रभागांमध्ये रुग्णवाढीचा वेग अपेक्षेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या प्रभागात जास्त खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे, असेही सांगण्यात आले. या प्रभागात प्रामुख्याने इमारतींमध्ये रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे निवासी संकुलांच्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. यात गृहविलगीकरणात असलेली व्यक्ती बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबत पालिकेच्या नियंत्रण कक्षात माहिती द्यावी. तसेच नागरिकांचे वेळोवेळी स्क्रिनिंग करण्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. यात रहिवाशांचा उष्मांक तपासणे ऑक्सिजन पातळी तपासणे अशी कामे करावी लागणार आहे.

मार्च महिन्यापासून कोविडचे रुग्ण आढळलेल्या ठिकाणी पालिकेने प्रतिबंधित क्षेत्र तयार केले होते. या क्षेत्रातून बाहेर येण्यासही रहिवाशांना मज्जाव करण्यात आला होता. मात्र आता मिनी प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहे. या क्षेत्रातील कामानिमित्त बाहेर येऊ दिले जात आहे. मात्र इतरांपेक्षा जास्त बंधने या क्षेत्रात आहे. पण पूर्वीप्रमाणे अत्यंत कठोर बंधने अद्याप लागू केलेली नाहीत.

पूर्व उपनगरातील टी प्रभाग - मुलुंड, एन - घाटकोपर, एस - भांडूप, एम पश्चिम - चेंबूर, एम पूर्व-गोवंडी, मानखुर्द विभागात रुग्णवाढ होत आहे. तर पचिम उपनगरातील के पूर्व - अंधेरी पूर्व, के पश्चिम - अंधेरी पश्चिम, आर मध्य - बोरिवली, आर दक्षिण - कांदिवली, पी उत्तर - मालाड, डी - ग्रॅटरोड भागात रुग्ण वाढ अधिक आहे. शिवाय एफ उत्तर - माटुंगा,  एच पश्चिम - वांद्रे पश्चिम आणि जी उत्तर - दादर, धारावी भागातही रुग्ण वाढ होत आहे.

--------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

bmc paying special attention weddings and bar pubs formed five squads each ward

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT