BMC on Marathi Plates on Shop sakal media
मुंबई

'३१ मेपर्यंत दुकानावर मराठी पाट्या लावा, अन्यथा...', मुंबई महापालिकेचे निर्देश

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुकाने आणि आस्थापनावर मराठीत फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. येत्या ३१ मेपर्यंत दुकानं, आस्थापना आणि कार्यालयांवरील नाम फलक मराठीत करा अन्यथा कारवाई केली जाईल, असे निर्देश मुंबई महापालिकेने (BMC) दिले आहेत.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना सुधारणा अधिनियम 2022 तील कलम 36 'क' (1) च्या कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला लागू असलेल्या कलम 7 नुसार मराठी भाषेतून नामफलक लावणे बंधनकारक आहे. या नियमाचं पालन न करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या की नाही? याबाबत पालिकेच्या दुकाने व आस्थापने विभागाकडून प्रत्येक वॉर्डमध्ये तपासणी करण्यात येणार आहे. चौकशीदरम्यान मराठी पाटी लावण्यास नकार दिल्यास थेट न्यायालयात खटला दाखल केला जाईल. न्यायालयीन कारवाई नको असल्यास दंड भरावा लागेल. यामध्ये एका कामगारामागे एक हजार किंवा कायद्यातील दंडाच्या तरतुदीप्रमाणे दंड आकारण्यात येईल, असेही निर्देश मुंबई महापालिकेने दिले आहेत.

दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याच्या तक्रारी राज्य सरकारला प्राप्त झाल्या होत्या. त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली जात होती. याबाबत राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयात संबंधितांची बैठक घेतली व कायदा सुधारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अधिवेशनात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमात सुधारणा करण्यात आली. बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेठ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यालगतच्या सर्वच दुकानावरील पाट्या मराठीतच लावाव्या लागणार आहेत. मराठीत देवनागरी लिपीतील अक्षरे दुसऱ्या इंग्रजी किंवा अन्य लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाईला 'बाई' करू, पुणे डीसीपींचे अजब विधान; लक्षात येताच तिथंच स्पष्ट केलं

BEST Bus: कर्मचारी कमी; मुंबईची लाइफलाइन धोक्यात! बेस्ट बस कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय वाढणार? मोठा निर्णय लवकरच

LPG Supply Policy India : केंद्र सरकारचा एलपीजी पुरवठ्याबाबत नवीन नियम, अमेरिका-इराण शस्त्रसंधी होताच मोठा निर्णय, आधी कुणाला मिळणार गॅस?

Latest Marathi News Live Update: धाराशिवमध्ये सुवासिनी कार्यक्रमाच्या जेवणातून 24 महिलांना विषबाधा

Samarjitsinh Ghatge BJP : समरजितसिंह घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश, पहिलीच प्रतिक्रिया हसन मुश्रीफांवर; "आमच्यात वैर..."

SCROLL FOR NEXT