संग्रहित छायाचित्र 
मुंबई

मुंबई पालिकेला कोरोना संसर्ग, कामांसाठी एफडी मोडणार?

सकाळवृत्तसेवा

मुंबई : आर्थिक मंदीच्या काळात सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंबई महापालिकेला आता कोरोनामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. पुढच्या विकासकामांना कात्री लावून आर्थिक बजेट रुळावर आणण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. त्यासाठी विविध बँकांतील ठेवी मोडण्याची वेळ पालिकेवर येईल, अशी  शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जाते आहे.

जीसटी लागू झाल्यानंतर पालिकेला जकात करातून मिळणाऱ्या कोट्यवधी महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे मालमत्ता कर वसुलीवर प्रशासनाने भर दिला आहे.  कोट्यवधी रुपयाचा मालमत्ता कर थकलेला असून तो वसूल करण्यासाठी पालिकेची दमछाक झाली आहे. त्यात आर्थिक मंदीचा फटका  पालिकेला सहन करावा लागत आहे. 

महसूल वाढीसाठी विविध पर्याय शोधत असतानाच कोरोनासारखा जीवघेण्या संसर्गाने थैमान घातले आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा मैदानात उतरली आहे. कोरोनामुळे  मुंबईच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. मुंबई महापालिकेचे आधीच आर्थिक  गणित कोलमडलेले असताना कोरोनाने त्यात भर टाकली आहे. येत्या काळात विकासकामांवर त्याचा आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. 

वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली शक्यता...
कोरोनाच्या संकटामुळे सध्या पाणी आणि मलनिसारणायासह अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्यात आली असून इतर कामे बंद आहेत. आगामी काळात विकासाचे मोठे प्रकल्प हाती घेताना पालिकेला आर्थिक चणचण निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे विकासकामांसाठी पालिकेला मुदत ठेवी मोडण्याचा विचार करावा लागेल, अशी शक्यताही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

SCROLL FOR NEXT