मुंबई

वनिकरण हवंच, पण एका झाडासाठी 55 हजार रुपये? तुम्हाला काय वाटतं, कळवा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य सरकारच्या 33 कोटी वृक्ष लागवडीचे उध्दीष्ट पुर्ण करण्यासाठी मुंबई महानगर पालिका शहरात 5977 झाडे लावणार आहेत. मियावाकी या पध्दतीने विविध ठिकाणी वनिकरण करण्यात येणार असून त्या प्रत्येक झाडासाठी 50 ते 55 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेच्या स्थायी समितीत आज 35 कोटी रुपये खर्च करुन जपानी पध्दतीच्या वनिकरणाचा प्रस्ताव मंजूरीसाठी आला होता. या वनिकरणासाठी होणाऱ्या खर्चावर सत्ताधारी शिवसेनेसह कॉंग्रेसच्या सदस्यांनीही प्रश्‍न उपस्थीत केला. मात्र, तरीही अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.

राज्य सरकारच्या वन विभागाने संपुर्ण राज्यात 33 कोटी झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील 5900 झाडे महापालिकेला लावायची आहे. ही झाडे लावताना महापालिका जपानी पध्दतीने वनिकरण करणार आहे. त्यात शहर आणि पश्‍चिम उपनगर विभागासाठी 14 कोटी 74 लाख 11 हजार रुपये आणि पूर्व उपनगरासाठी 20 कोटी 69 लाख रुपये खर्च करणार आहे. 

या भरमसाठ खर्चा बरोबरच मैदानांमध्ये वनिकरण झाल्यास मोकळ्या जांगाचा प्रमाण कमी होईल असा आक्षेप कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी घेतला. तर, या हिशोबाने प्रत्येक झाडासाठी 50 ते 55 हजार रुपये खर्च होणार आहे. या खर्चावर शिवसेनेच्या सदस्यांनी प्रश्‍न उपस्थीत केला. तर, शहरात झाडांची संख्या वाढली पाहिजे असे मत नोंदवत अध्यक्ष जाधव यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. 

100 वर्षाचे जंगल 10 वर्षात 

मियावाकी पध्दतीने 100 वर्षात तयार होणारे जंगल 10 वर्षातच तयार होते.असे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.तसेच,या वनांमध्ये देशी पध्दतीचे झाडे लावण्यात येणार असून दोन वर्ष या जंगलाची देखभाल संबंधीत कंत्राटदार करणार आहे.त्याच बरोबर मैदानांमध्ये हे वनिकरण करण्यात येणार नाही असेही परदेशी यांनी सांगितले. 

महत्त्वाची बातमी :  बापाने वाजवला पोराचा गेम, कारण ऐकाल तर सुन्न व्हाल..

काय आहे मियावाकी 

1960 मध्ये अकीरा मियावाकी यांनी या पध्दतीच्या वनिकरणाचा शोध लावला.कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावली जातात.जपान मध्ये आलेल्या सुनामीमुळे जंगले मोठ्या प्रमाणात नष्ट झाली होती.त्यावेळी 
जपान मध्ये या पध्दतीने वनिकरण करण्यात आले. 

याबाबत तुम्हाला काय वाटतंय ? प्रतिक्रियांमध्ये नक्की कळवा..  

Webtitle : BMC will spend around fifty to fifty five thousand rupees for on tree

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT