मुंबई

वाढदिवसाची पार्टी म्हणून बोलावले परंतु गुंगीचे औषध पाजून चौघांनी केले दुष्कृत्य...

सकाळ वृत्तसेवा


मुंबई :  मानखुर्द येथे 44 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यातील एका आरोपीने मुलाचा वाढदिवस असल्याचे सांगून पार्टीसाठी महिलेला बोलावून शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केलाचा आरोप आहे.

अब्दुल जिलानी सत्तार शेख(34), हैदर अली सरदार शेख ऊर्फ हिरा(35), मुराद मेहबूब शेख उर्फ राज(29) व मोहम्मद मुदाशीर नबी शेख उर्फ नबी उर्फ रहिम (34) अशी अटक आरोपीची नाव आहेत. यातील रहिम हा मानखुर्द येथील रहिवासी असून उर्वतीत तिघे आरोपी माटुंगा लेबर कँप येथील रहिवासी आहेत.

पीडित महिला विमा सल्लागार म्हणून काम करते. आरोपी अब्दुलने महिलेला त्याच्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी असल्याचे सांगून तिला बोलावले होते. महिला तेथे गेली असता तेथे अब्दुलच्या घरातील कोणीही उपस्थित नव्हते. आरोपीने तिला आपण मित्रांसोबत पार्टी करत असल्याचे सांगून तिला शीतपेय दिले. त्यानंतर तिला गुंगी आल्यानंतर चौघांनी तिच्यावर बलात्कार केला. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा प्रकार घडला.

या प्रकारानंतर महिला रुग्णालयात दाखल झाली होती. तेथे शुद्धीवर आल्यावर तिने हा प्रकार तेथील डॉक्टरांच्या कानावर घातला. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन महिलेचा जबाब नोंदवला. त्यानुसार याप्रकरणी सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपींना पोलिस कोठडी
प्राथमिक वैद्यकीय अहवालात महिलेवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले असून तिच्या अंगावर नख मारल्याच्या जखमा आहेत. याप्रकरणी सर्व आरोपी 8 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत आहेत. याप्रकरणी पोलिस पुरावे गोळा करत असून सीआरपीसी 164 अंतर्गत महिलेचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT