मुंबई

ब्रोकरला फोन करून दुसऱ्या चावीने रूमचा दरवाजा उघडला आणि रिनाच्या मैत्रिणींच्या पायाखाची जमीन सरकली

सुमित बागुल

नवी मुंबई : नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. नवी मुंबईतील कळंबोली भागात एका तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार 7 डिसेंबर रोजी नवी मुंबईतील कळंबोली परिसरातील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये रीना शेख हिचा मृतदेह आढळून आला होता. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणीची २१ दिवसांपूर्वी म्हणजेच तीन आठवड्यांपूर्वी हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर तरुणीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. 

प्रकरण नक्की आहे तरी काय ?  

नवी मुंबईतील कळंबोली भागात हत्या झालेली तरुणी एक बांगलादेशी तरुणी होती. तिच्या प्रियकरानेच तिची निर्घृण हत्या केल्याची ही घटना आहे. रीना ही कळंबोलीमध्ये तिच्या दोन मैत्रिणींसोबत राहत होती. या दोन्ही मैत्रिणीही बांगलादेशी होत्या. लॉकडाऊनमुळे रोजगार गेल्याने या दोघी परत बांग्लादेशात गेल्या होत्या. या काळात रीना एकटीच रूमवर राहत होती. दरम्यान काही दिवसांनी रिनाच्या मैत्रिणी परतल्यात. रूमवर जाण्यासाठी त्यांनी तिला फोन केला. मात्र तिने फोन उचलला नाही. त्यानंतर त्यांनी ब्रोकरला फोन करून दुसऱ्या चावीने रूमचा दरवाजा उघडला आणि त्यांच्या पायाखाची जमीन सरकली. रूमचा दरवाजा उघडला आणि कुजलेल्या अवस्थेतील रीनाचा मृतदेह त्यांना आढळून आला. 

पोलिसांनी फिरवलीत चक्र आणि...

दरम्यान, याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी तपास सुरु केला. रिनाचा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला. यामधून पोलिसांना एका व्यतीवर संशय आला. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ज्याला पकडलं तो रिनाचा प्रियकर निघाला. रिनाचे आणखीन कुणाशीतरी संबंध असल्याच्या कारणावरून आपणच तिचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली या इसमाने दिली आहे. रिनाच्या मैत्रिणी स्वदेशी परतल्यावर बॉयफ्रेंड भरत आणि रीना एकत्र राहत होते. रिनाची हत्या केल्यानंतर भरत फरार होता. यावरून पोलिसांचा संशय बळावला होता आणि पोलिसांनी त्याला अखेर बेड्या ठोकत ही केस निकाली काढलीये. खुनाच्या आरोपात न्यायालयाने भरतला पोलिस कोठडी सुनावली आहे. 

boyfriend of bangladeshi young girl took extreme step and finished her in navi mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

B.Ed student set herself on fire: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

IND vs ENG 3rd Test: रिषभला जसं बाद केलं तसंच करायला गेले, पण सहावेळा तोंडावर आपटले; इंग्लंडची चूक भारताच्या पथ्यावर Video

Pune News: माेठी बातमी! 'संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा'; पुरंदर-हवेली मतदारसंघात खळबळ

Solapur: राष्ट्रवादीच्या दोन जिल्हाध्यक्षपदाचा तिढा सोमवारी सुटणार?; बळिराम साठे ज्येष्ठ नेते शरद पवारांना भेटणार

Latest Marathi News Updates : पुणेकरांसाठी आता खासदार कार्यालय दिवसरात्र खुलं राहणार - मुरलीधर मोहोळ

SCROLL FOR NEXT