मुंबई

Breast Reconstruction Surgery In Mumbai: टाटाच्या डॉक्टरांनी रचला इतिहास; केली नव्या पद्धतीने ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी

Navi Mumbai : जुन्या पद्धतीच्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत ही शस्त्रक्रिया रुग्णांसाठी लाभदायक आहे.

सकाळ वृत्तसेवा

Latest Mumbai News: नवी मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयातील डॉक्टरांनी नव्या पद्धतीने ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी केली आहे. पहिल्यांदाच जनावराची त्वचा (मेष) वापरून ती संपूर्णपणे पेशीमुक्त करण्यात आली.

फक्त कोलॅजन म्हणजे त्यातले प्रोटीन ठेवण्यात आले. त्यात इम्प्लांट ठेवले जाते. कालांतराने रुग्णाच्या पेशी त्यात तयार होतात. स्तनाच्या शस्त्रक्रियेनंतर स्तन पूर्वीसारखेच सामान्य दिसते. या प्रकारची शस्त्रक्रिया पश्चिम भारतात प्रथमच करण्यात झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. यासह जुन्या पद्धतीच्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत ही शस्त्रक्रिया रुग्णांसाठी लाभदायक आहे.

भारतात दरवर्षी एक लाख ७८ हजार महिलांना स्तनाचा कर्करोग होतो. अनेकवेळा डॉक्टर शस्त्रक्रियेद्वारे कर्करोगाची गाठ काढून टाकतात, परंतु अनेक प्रकरणांमध्ये संपूर्ण स्तन काढून टाकावे लागते. अशा परिस्थितीत डॉक्टर सणाच्या पाठीवरून, पोटाच्या खालच्या भागातून काही चरबी आणि त्वचा काढून स्तनाची पुनर्रचना करतात, परंतु या प्रक्रियेत अनेक अडथळे येतात. हे लक्षात घेऊन

ब्रिटनहून आलेले ज्येष्ठ ब्रेस्ट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अमर देशपांडे यांनी रुग्णावर नव्या पद्धतीने ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी केली. डॉ. अमर म्हणाले, जुन्या पद्धतीचा वापर करून केलेल्या शस्त्रक्रियेसाठी ५०६ तास लागतात.

स्तनाची पुनर्रचना रुग्णाच्या शरीरातील ऊती म्हणजे पाठीचा, पोटाचा खालचा भाग किंवा इतर भाग घेऊन करावा लागतो. काहीवेळा शस्त्रक्रियेनंतर संसर्ग होण्याचा धोका असतो आणि शस्त्रक्रियेनंतर बरे होण्यास सहा ते आठ आठवडे लागतात. नवीन ब्रेक्सन

पद्धतीत शस्त्रक्रियेला फक्त दोन ते तीन तास लागतात. रुग्णाच्या शरीरातून त्वचा आणि चरबी घेण्याची गरज नाही, याचा अर्थ शस्त्रक्रियेनंतर संसर्ग होण्याचा धोकादेखील कमी असतो. शस्त्रक्रिया सोपी असल्याने वेदनाही खूप कमी होतात. या शस्त्रक्रियेमध्ये आम्ही सिलिकॉन इम्प्लांट जैविक जाळीत गुंडाळून शस्त्रक्रिया करतो. अंदाजे १.७ लाख रुपये खर्च येतो, जो जुन्या शस्त्रक्रियांच्या खर्चाइतकाच आहे, असेही त्यांनी सांगितले.

टाटा रुग्णालयात दरवर्षी पाच हजार स्तनाच्या कर्करोगाची प्रकरणे नोंदवली जातात. टाटा रुग्णालयाच्या ब्रेस्ट सर्जरी विभागाच्या प्रा. डॉ. शलाका जोशी म्हणाल्या, जुन्या पद्धतीव्यतिरिक्त नवीन पद्धतीच्या शस्त्रक्रियांचा लाभ गरजू रुग्णांना मिळत राहील. पूर्वी तज्ज्ञांच्या कमतरतेमुळे ही नि शस्त्रक्रिया होत नव्हती. ब्रिटनमधील अनेक महिलांवर ही शस्त्रक्रिया करून चांगले परिणाम मिळाले आहेत.

न्यूरो सर्जरी विभाग अद्ययावत करणार

टाटा मेमोरियल सेंटरचा न्यूरो सर्जरी विभाग अपग्रेड 1 होणार आहेय अत्याधुनिक उपकरणे आणि चाचणी यंत्रे दाखल होणार आहेत. यासाठी युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंड टाटा रुग्णालयाला मदत करणार आहे. या रकमेच्या मदतीने न्यूरो सर्जिकल ऑन्कोलॉजीचे

2 प्रगत केंद्र स्थापन केले जाईल. यात रोबोटिक मायक्रोस्कोप, अल्ट्रासाऊंड इमेज़िंग सिस्टीम, एन्डोस्कोपी उपकरणे आणि इतर अत्याधुनिक आणि अत्यंत महत्त्वाची उपकरणे असतील. त्यामुळे डॉक्टरांना मेंदू आणि मणक्याच्या ट्यूमरच्या अगदी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सहज करता येतील. यासाठी बँकेकडून रुग्णालयाला १० कोटी रुपयांचे अनुदानही देण्यात आले आहे.

स्तनाच्या कर्करोगात महिलेचे स्तन शस्त्रक्रियेद्वारे काढले जातात. स्त्रीसाठी ही अत्यंत निराशाजनक परिस्थिती आहे. रुग्णालयाने नेहमीच स्तनांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. अमर आणि त्यांच्या टीमचे कौशल्य आणि अनुभवाच्या मदतीने महिलांचा सन्मान राखण्याचे काम केले जाईल.

- डॉ. राजेंद्र बडवे, ब्रेस्ट सर्जन आणि प्रोफेसर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT