...आता तुमचा टीव्ही होणार मुलांचा शिक्षक; होऊ शकतो 'हा' निर्णय 
मुंबई

...आता तुमचा टीव्ही होणार मुलांचा शिक्षक; होऊ शकतो 'हा' निर्णय

सकाळ वृत्तसेवा

तुर्भे (बातमीदार) : कोरोनामुळे भविष्यात शाळा केव्हा सुरू होतील याची शाश्वती नाही. म्हणून शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना स्वयंअभ्यासासाठी पीडीएफ फाईल अँप व वेबसाईटद्वारे पुढील वर्षाच्या अभ्यासासाठी दिल्या जात आहेत; परंतु यासाठी हवा असणारा स्मार्टफोन प्रत्येकाकडे असतोच असे नाही. म्हणून केंद्र व राज्य शासनाने पहिली ते बारावी या वर्गाचे अभ्यासक्रम शासकीय दूरचित्रवाणीवर प्रसारीत करावे, अशी मागणी भाजप व पालघर जिल्ह्याचे चिटणीस संजय पवार यांनी केंद्रीय प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर व राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे.

आपल्या स्वतःच्या दीक्षा अँप व इतर वेबसाईटवर विद्यार्थ्यांचे 2020/21 या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून पीडीएफ फाईलद्वारे स्वयंअभ्यास करावा म्हणून फाईल टाकल्या आहेत; परंतु या शैक्षणिक फाईल जर घ्यायच्या असतील तर स्मार्टफोन हवा असतो. तसेच त्याला इंटरनेटची जोडणी अत्यावश्यक आहे; परंतु शहरातील झोपडपट्टी, गावठाण व ग्रामीण भागातील बहुतांशी नागरिकांकडे आर्थिक दुर्बलतेमुळे हे साहित्य असतेच असे नाही. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यासाठी दूरचित्रवाणी माध्यम योग्य ठरेल, असे पत्रात संजय पवार यांनी म्हटले आहे.

सध्या सह्याद्री या शासकीय दूरचित्रवाणीवर विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम दुपारी 12 ते 2 प्रसारित होत आहे; पण ती वेळ कमी पडत आहे. तसेच सगळ्याच कुटुंबात टीव्ही असतेच असे नाही. म्हणून शासनाने रेडिओ, एफएम रेडिओ अशा मध्यामाचा वापर केला तर साहजिकच ज्यांना अभ्यासाविषयी गोडी आहे, अशा विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. ते करण्याची गरज आहे.
- सुरेश देशमुख, वरिष्ठ शिक्षक, नवी मुंबई.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT