मुंबई

शिक्षकांच्या माथी अहवालाचे ओझे; ऑनलाइन शिक्षणाची माहिती देण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचना

तेजस वाघमारे

मुंबई : विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना  दर आठवड्याला शिकवणीचा अहवाल द्यावा लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी केलेल्या प्रयत्नांचा हा अहवाल असून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला (एमएससीईआरटी) सादर करावा लागणार आहे.

राज्यातील बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळा, शिक्षक करत असलेल्या प्रयत्नांची माहिती केंद्र सरकार तसेच इतर राज्यांसोबत होणा-या बैठकीत सादर करण्यासाठी एमएससीईआरटीने ही माहीती मागवली आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, माध्यमाच्या बारावीपर्यंतच्या शिक्षकांकडून हा अहवाल मिळणे अपेक्षित असल्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले.

दर आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवारी शिक्षकांनी आपला अहवाल सादर करायचा आहे.एमएससीईआरटीने दिलेल्या या सूचनांमुळे शिक्षक वर्गात नाराजी पसरली आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे आधीच कामाचा व्याप वाढला आहे. त्यातच कोरोनाची टांगती तलवार ही डोक्यावर आहे. त्यात भर म्हणून आणखी एका अशैक्षणिक कामाचा बोजा शिक्षकांच्या खांद्यावर टाकल्याचे बोलले जात आहे. 

या कामाची नोंद करावी लागणार
- विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देणे
- फोनच्या माध्यमातून कम्युनिटी क्लासेस चालविणे
- शिक्षक-मित्र तयार करणे
- शाळेमध्ये राबविले जाणार इतर उपक्रम
- किती विद्यार्थ्यांपर्यंत संपर्क साधला, किती तास अभ्यास झाला, शिक्षणाचे माध्यम कोणते याची माहिती द्यावी लागणार आहे.

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT