मुंबई

फसवणुक प्रकरणात व्यावसायिकाला अटक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : फ्लॅट खरेदी-विक्रीच्या नावाखाली बोगस दस्तावेज सादर करुन एका व्यक्ती आणि खासगी बँकेची चार कोटी रुपयांची फसवणुक करण्याप्रकरणी वांद्रे पोलीसांनी हार्दीक नितीन गोठी या व्यावसायिकाला गुरुवारी (ता.21) अटक केली आहे. या प्रकरणातील हा दुसरा आरोपी आहे. त्याला शुक्रवारी (ता.22) न्यायालयात हजर केले असता, २६ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याआधी वांद्रे पोलीसांनी प्रकाश हिराराम मारु या आरोपीला अटक केली होती. गोठी या प्रकरणातील दुसरा आरोपी असून पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. 

बोगस दस्तावेज सादर करुन एका व्यक्तीकडून फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन या टोळीने एका व्यक्तीसह एका खासगी बॅंकेची फसवणुक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे वांद्रे परिरासत राहत असून त्यांच्या मालकीचा एक फ्लॅट त्यांना विकायचा होता, त्याकरीता त्यांनी त्यांचा मित्र आरीफ सय्यदसह परिसरातील इस्टेट एजंटला माहिती दिली होती. जून २०१७ मध्ये आरिफच्या ओळखीच्या अब्दुल्ला खान उर्फ पप्पू याने त्यांना फोन करुन हा फ्लॅट खरेदीकरीता त्याचा मित्र नरेंद्र अग्रवाल हा इच्छुक असल्याचे सांगितले. काही दिवसानंतर त्यांची त्यांच्याच घरी भेट झाली होती. या चर्चेत हा फ्लॅट ५ कोटी ४२ लाख रुपयांना विकण्याचे ठरले होते. त्यानंतर नरेंद्र अग्रवाल याने ही रक्कम जास्त असल्याने त्याला बॅंकेतून कर्ज घ्यावे लागेल असे सांगितले होते. तर त्याचा मित्र राकेश चक्रवर्ती हा बॅंकेतून कर्ज काढून त्याच्याच नावावर फ्लॅट खरेदी-विक्रीचा करारनामा करु अशी विनंती केली होती. त्याकरीता तक्रारदार तयार झाले होते. त्यानंतर अब्दुल्ला हा नरेंद्र व राकेश या दाेघांना घेऊन त्यांच्या घरी आला.  त्यावेळी त्यांना दहा लाख रुपये टोकन म्हणून देण्याचे व उर्वरित ५ कोटी ३२ लाख रुपये कर्ज काढून दिले जाईल असे सांगण्यात आले. ही रक्कम दिल्यानंतर त्यांच्यात करारनामा होऊन नंतर ते कागदपत्रे बॅंकेत दिले जातील त्यानंतर कर्जाची प्रोसेसिंग सुरु होईल असे सांगण्यात आले.

२० जून २०१७ रोजी राकेशने त्यांना दहा लाख रुपये त्यांच्या बॅंक खात्यात टाकले होते. दहा दिवसांनी रितसर अॅग्रीमेंट फॅार सेलचे कागदपत्रे तयार करुन ते उपनिंबधक कार्यालयात सादर करण्यात आले होते. ११ जुलैला राकेशने त्यांना फोन करुन बॅंकेने चार काेटी अकरा लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. व उर्वरित रक्कम नसल्याने सदर फ्लॅटचा खरेदी विक्रीचा व्यवहार रद्द करण्याची विनंती केली हाेती. करारानुसार, दहा लाख रुपये त्यानंतर फ्लॅटचे सर्व कागदपत्रे बॅंकेतून परत करण्याचे मान्य केले होते. त्यांच्या बोलण्यावर तक्रारदारांनी विश्वास ठेवून त्यास होकार दिला होता. यावेळी त्यांनी त्यांच्याकडील नऊ ब्लॅंक चेक सही करुन राकेश चक्रवर्तीला दिले होते. यावेळी त्यांनी अब्दुलाला ब्रोकरेज म्हणून आठ लाख ऐंशी हजार रुपयांचे तीन चेक दिले होते.
१४ जुलै २०१७ रोजी त्यांच्या स्टेट बॅंक मध्ये चार कोटी पाच लाख रुपये जमा झाले होते. ही रक्कम जमा होताच राकेशने मारबलेक्स सिटी इन्फ्रा(अब्दुल्ला खान उर्फ पप्पू), वैदेही डायकेम (नरेंद्र अग्रवाल-राजेश डहाणूकर), प्रकाश हिरामराम (नरेंद्रकडे काम करणार प्रकाश मारु), वैदेही सहकारी पेठ, श्री फुड‌्स (राकेश चक्रवर्ती), हार्दीक नितीन गोठी, नरेंद्र अग्रवाल, व चामुंडा इंटरप्रायसेज या नऊ बॅंक खात्यात चार कोटी पाच लाख‌ रुपये वळते केले होते.

हा व्यवहार झाल्यानंतर तक्रारदाराने राकेशला फोन करुन बँकेचे कॅन्सलेशन व फ्लॅटचे इतर कागदपत्रे आणून देण्यास सांगितले. त्यावेळी त्यानेही सर्व पैसे परत केल्यानंतर कागदपत्रे आणून देतो असे सांगण्यात आले. पण त्यानंतर डिसेंबर २०१७ पासून त्याने त्याचा मोबाईल फोन बंद ठेवला होता. १७ मार्च २०१८ रोजी राकेशने त्याच्या वकिलाच्या मार्फत पत्रव्यवहार करुन सोसायटीला तक्रारदाराचा फ्लॅट त्याने खरेदी केला असून फ्लॅटचे शेअर सर्टिफिकेट, मेटंनन्स बिल व इतर कागदपत्रे त्याच्या नावावर करण्याची विनंती केली  होती. पण तसे झाले नाही.

२१ मे २०१८ रोजी पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे काही अधिकारी त्यांच्या घरी आले. त्यांनी या फ्लॅटसाठी राकेशने बॅंककडून चार कोटी पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाचे हप्ते फेडले नाही, फ्लॅटचे सर्व कागदपत्रे त्याच्याच नावावर असून त्याने हप्ते न भरल्यानंतर फ्लॅटवर कारवाई होणार असल्याचे सांगिगले. त्यानंतर त्यांनी बॅंक अधिकाऱ्यांना राकेशसह इतर आरोपींनी त्यांची कशा प्रकारे फसवणूक केली याबाबत सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर तक्रारदाराने वांद्रे पोलिसात लेखी अर्जाद्वारे संबंधित आरोपीविरुध्द तक्रार केली होती. या तक्रारीचा शहानिशा केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT