Mayuresh-Raut Social-Media
मुंबई

"मनसुख त्यांचा जवळचा मित्र होता, माझा तर..."- मयुरेश राऊत

"परमबीर सिंह कमिशनर असताना हे सर्व होऊ शकते, तर..."

सुरज सावंत

मुंबई: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) आणि राजकुमार कोथमिरे (Rajkumar Kothmire) यांच्याविरुद्ध तक्रार करणारे व्यावसायिक मयुरेश राऊत (Mayuresh Raut) यांनी त्यांच्या जीवला धोका असल्याचे म्हटले आहे. मयुरेश राऊत या व्यावसायिकाला शुक्रवारी एनआयए कार्यालयात बोलवण्यात आले होते. मयुरेश राऊत यांची एनआयए (NIA) कडून तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली. NIA कार्यालयातून बाहेर आल्यानंतर मयुरेश राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Businessman Mayuresh Raut allegation against Parambir Singh)

ठाणे पोलिसांनी जबरदस्ती आपल्या दोन गाड्या ताब्यात घेतल्या, असा मयुरेश राऊत यांचा आरोप आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात त्यांच्या दोन गाड्यांचा वापर झाल्याचा संशय मयुरेश राऊत यांनी व्यक्त केला होता. "परमबीर सिंह, प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथमिरे यांच्याविरुद्ध माझी तक्रार होती. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी माझं म्हणण समजून घेतलं. या प्रकरणात कोणी दोषी आढळलं किंवा गाड्यांचा गैरवापर झाला असल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन मला NIA ने दिले आहे" असे मयुरेश राऊत यांनी सांगितले.

"परमबीर सिंह यांच्या कार्यालयातून गाड्या निघाल्या. डीव्हीआर हरवले. परमबीर सिंह कमिशनर असताना, हे सर्व होऊ शकते, तर मी एक साधा माणूस आहे. माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे मी NIA ला माझी बाजू समजावून सांगितली" असे मयुरेश राऊत म्हणाले.

या गाड्या तुमच्याकडून कधी घेतल्या? असा प्रश्न मयुरेश राऊत यांना विचारला, त्यावर त्यांनी "2017 साली पोलिसांनी जबरदस्तीने गाड्या माझ्याकडून घेतल्या. त्यावेळी परमबीर सिंह ठाण्याचे पोलीस आयुक्त होते. प्रदीप शर्मा भ्रष्टाचारविरोधी खात्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते. राजकुमार कोथमिरे पोलीस निरीक्षक होते." NIA माझी चौकशी केली नाही. त्यांनी तक्रारीबद्दल चर्चा केली, असे राऊत म्हणाले.

"चोरीला गेलेल्या त्या गाड्या आजही पोलिसांनी लपवून ठेवल्या आहेत. या प्रकरणात 2018 मध्येच मुंबई उच्च न्यायालयाने FIR नोंदवण्याची ऑर्डर दिली आहे. पण अजूनही तक्रार नोंदवलेली नाही. विरार पोलिसांनी ताबडतोब FIR नोंदवावा. प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे, अविनाश बाबर आणि विकास महाजन यांनी आपल्या गाड्या घेतल्या" असे मयुरेश राऊत म्हणाले.

"मी गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे. माझ्या देखील जीवाला धोका आहे. मनसुख हिरेन त्यांचा जवळचा मित्र असताना हत्या झाली. माझा तर दूरदूरपर्यंत संबंध नाही. मला खूप धमकीचे फोन येत आहेत. मी पोलीस सुरक्षेसाठी अर्ज करणार आहे" असे मयुरेश राऊत म्हणाले.

(संपादन- दिनानाथ परब)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT