मुंबई

भायखळा, वरळी डेंगी बॉम्बवर; महापालिकेने हलवल्यात तब्बल १ लाख वस्तू... 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : भायखळा, वरळी, मानखुर्द-गोवंडी, लालबाग परळ कोरोनाच्या विळख्यातून सुटत असताना पावसाच्या तोंडावर डेंगी आणि मलेरीया पसरवणाऱ्या डासांच्या हिटलिस्टवर आले आहे. हे डास निर्माण होऊ शकतील अशा वस्तू हटवण्यास महानगर पालिकेने सुरुवात केली असून 1 लाखाहून अधिक वस्तु हटविण्यात आल्या आहेत. यात सर्वाधिक भायखळा ई प्रभाग, वरळी जी दक्षिण आणि चेंबूर एम पश्‍चिम, लालबाग परळ एफ दक्षिण प्रभागातून अशा वस्तु हटविण्यात आल्या आहेत.

थर्माकॉल, रिकामे पिंप, तोंड बंद नसलेले गॅलन, बाटल्याची बुच एवढेच काय टायर्स अशा उघड्यावर पडलेल्या वस्तुंमध्ये पावसाचे पाणी साचल्यावर त्यात मलेरिया डेंगी पसरवणारे डास अंडी घालतात. हे डास फक्त स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. त्यामुळे अशा वस्तु काढून टाकण्याचे आवाहान महानगर पालिकेकडून नेमहीच केले जाते. मात्र, जानेवारीपासून महानगर पालिकेने सुरु केलेल्या मोहिमेतून शहर भरातून 1 लाख 8 हजारहून अधिक डेंगी आणि मलेरीयाच्या डासांची पैदास होऊ शकतील अशा वस्तु हटवल्या आहेत.

भायखळा परीसरातून 16 हजार 355, वरळी, प्रभादेवी परीसरातून 8 हजार 32 आणि चेंबूर प्रभागातून 7 हजार 819 आणि लालबाग परळ मधून 7 हजार 395 वस्तू हटविण्यात आल्या आहेत. या ई प्रभागात तीन हजारहून अधिक आणि या उर्वरीत तीन प्रभागात अडीज हजाराहून अधिक कोविड बाधित रुग्ण आढळले आहे. वरळी परीसर हा एप्रिल पासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत कोविडचा देशातील हॉटस्पॉट होता. त्यानंतर आता या सर्व परीसरात डेंगी मलेरीया धोका पुढे येत आहे.

514 टायर्सही हटवले
या मोहिमेत पालिकेच्या पथकाने 514 टायर्सही हटवले आहेत. त्यात सर्वाधिक एफ दक्षिण विभागातच 123 टायर्स हटविण्यात आले आहे. त्या खालोखाल घाटकोपर एन विभाग 99 आणि कुर्ला एल विभागातून 48 टायर्स हटविण्यात आले आहेत.

  • वातानुकूलीत यंत्रातील पाणी जमा करण्याचे भांडे
  • झाडांच्या कुंडीखालील थाळीत पाणी जमा असल्यास
  • रेफ्रिजरेटरची डिफ्रॉज ट्रे
  • मनीप्लांट,बांबू प्लांट सारख्या शोभिवंत झाड असलेली पाण्याची भांडी.

अंडी पाण्याशिवायही जगतात

डास हे अगदी चमचाभर पाण्यातही अंडी देऊ शकतात. हे पाणी सुकल्यानंतर वर्षभर अंडी पाण्याशिवाय जगू शकतात. पुन्हा पाण्याचा संपर्क आल्यानंतर त्यातून डासांची पैदास होऊ शकते. त्यामुळे फक्त पाणी फेकून देणे पुरेसे नसून भांडे कापडाने पुसून घेणेही गरजेचे आहे.

bycull and worli are seating on dengue bomb bmc checked more than one lac things

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT