school 
मुंबई

पालकांनो लक्ष द्या ! पालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई शाळेची 'या' तारखेला ऑनलाईन सोडत

सकाळवृत्तसेवा

मुंबई : महापालिका हद्दीतील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी मुंबई महापालिकेने सीबीएसई आणि आयसीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळांसाठी दोन हजार 497 अर्ज प्राप्त झाले आहेत. या शाळांच्या प्रवेशासाठी 30 एप्रिल रोजी ऑनलाईन सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी दोन विद्यार्थी आणि पालकांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडतीच्या चिट्टी काढण्यात येणार आहे.

सीबीएसई बोर्डाची शाळा पालिकेच्या अंधेरी पूर्वेकडील पूनम नगर मनपा शाळेत; तर आयसीएसई बोर्डाची शाळा माटुंगा पश्‍चिमेकडील वूलन मिल मनपा शाळेमध्ये सुरू करण्यात येणार आहे. दोन्ही बोर्डाच्या शाळा या सध्या प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यात येणार आहेत. त्यानुसार दोन्ही शाळांमध्ये ज्युनियर, सिनियर केजी पहिली ते सहावीचे वर्ग 2020 - 21 या शैक्षणिक वर्षात सुरू करण्यात येणार आहेत. या शाळांच्या प्रवेशाची प्रक्रिया 27 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. प्रवेशासाठी पालकांनी 12 मार्च पर्यंत अर्ज केले असून सीबीएसईच्या प्रवेशासाठी 2 हजार 154 विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. तसेच आयसीएसई शाळेसाठी 343 अर्ज आले आहेत. चालू शैक्षणिक वर्षासाठी दुसरीपर्यंतचे वर्ग सुरू केले जातील. तर इयत्ता तिसरी ते सहावीच्या वर्गात किमान 10 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास तिसरी ते सहावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. 

... तरचं सोडत काढणार
ज्या इयत्तेत प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची संख्या 38 पेक्षा अधिक असेल त्याच वर्गाची सोडत काढण्यात येणार आहे. 27 एप्रिलला विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. तर सोडतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून 10 मे पर्यंत अर्ज भरून घेण्यात येणार आहे.

 The CBSE of the municipality will selection the ICSE school on April 30

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT