मुंबई

निर्भयाच्या नराधमांवर दररोज ५० हजार खर्च.. तुमची प्रतिक्रिया काय ?

सकाळ वृत्तसेवा

२०१२ साली झालेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातले दोषी असलेल्या चारही नराधमांवर सरकारकडून दररोज तब्बल ५० हजार रुपये खर्च केले जात आहेत अशी माहिती समोर आलीये. खरं म्हणजे हा खर्च त्यांच्या सुरक्षेवर केला जात आहे. येत्या १ फेब्रुवारीला या चारही आरोपींना फाशी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर अधिक लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसंच त्यांच्या फाशीसाठी लागणार खर्चही यात येणार आहे.

कोठडीच्या बाहेर तैनात केलेले ३२ सुरक्षा रक्षक आणि फाशीच्या तयारीसाठी करण्यात येणारी कामं यांच्यावर हा खर्च केला जात आहे. सुरक्षा रक्षकांना विश्रांती मिळावी यासाठी दर दोन तासाला ड्युटी बदलली जात आहे.  चारही कैद्यांना तिहारमधील जेल क्रमांक ३ मध्ये वेगवेगळ्या कोठड्यांमध्ये ठेवण्यात आलं आहे. प्रत्येकाच्या कोठडीबाहेर दोन सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यातील एक हिंदी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असलेला तामिळनाडू विशेष पोलीस दलातील कर्मचारी आणि एक तिहार तुरुंग प्रशासनातील अधिकारी आहे.

गुन्हेगाराच्या कोठडीबाहेर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांची दर दोन तासाला ड्युटी बदलली जाते. प्रत्येक कैद्यासाठी २४ तासांसाठी आठ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. म्हणजेच चार कैद्यांसाठी एकूण ३२ सुरक्षा रक्षक तैनात आहेत. ते २४ तासांत ४८ शिफ्टमध्ये काम करत आहेत . त्यामुळे प्रचंड सुरक्षा या जेलमध्ये ठेवण्यात आली आहे. त्याचमुळे इतका खर्च या संगळ्यावर होतोय.

मोठी बातमी - अनेक महिन्यांपासून मृतदेह शवागारात; वाचा काय झाले
 
फाशीची शिक्षा ठोठावण्याच्या आधीपर्यंत या सर्व नराधमांना अन्य कैदयांसोबत ठेवण्यात येत होतं. मात्र आता डेथ वारंट निघाल्यानंतर त्यांना स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आलंय. डेथ वॉरंट जारी झाल्यानंतर त्यांनी आत्महत्या करू नये किंवा तुरुंगातून पळून जाऊ नये म्हणून ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारेसुद्धा त्यांच्यावर लक्ष ठेवलं जात आहे.

central government is spending 50 thousand rupees daily on Nirbhayas convicts

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT