मुंबई

कोरोनासाठी महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून कौतुक

भाग्यश्री भुवड

मुंबई 11 : देशातील विविध राज्यांनी केलेल्या कोरोना उपाययोजनांचा आढावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. कोरोनाकाळात महाराष्ट्र राज्याने सामान्य माणूस केंद्रीत जे नाविन्यपूर्ण निर्णय घेतले त्याबद्दल डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी कौतुक केले. या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासह सात राज्यांचा आढावा घेतला. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यावेळी उपस्थित होते. 

कोरोना नियंत्रणासाठी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून चाचण्यांचे दर कमी करणे, एचआरसीटी चाचण्यांच्या दरांवर नियंत्रण, प्लाझ्माच्या दरावर तसेच मास्कच्या दरांवर नियंत्रण, खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा राखीव ठेवणे, महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व नागरिकांना लागू करणे, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम यासारखे चांगले व अभिनव निर्णय महाराष्ट्रने घेतले आहे ते अन्य राज्यांसाठी उपयुक्त ठरतील अशा शब्दात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले. 

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत खासगी डॉक्टरांना विमा संरक्षण मिळावे - राज्यातील सर्व खासगी डॉक्टरांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा संरक्षण मिळण्याची मागणी आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी केली. त्यावर यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत कोरोनाविषयक तपासणी व जनजागृती करता आल्याने त्याचा प्रभावी परिणाम दिसून येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी दिली. 

दिवाळी सण, हिवाळा यापार्श्वभूमीवर राज्य शासन घेत असलेल्या खबरदारीविषयी आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यातील ॲक्टीव्ह केसेस कमी झाल्या आहेत. सध्या 92 हजार रुग्ण उपचाराखाली असून रुग्णसंख्या वाढूनये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संख्या वाढलीच तर त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. खाटांचे नियोजन, औषधांचा साठा पुरेसा असून चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याचा मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी जिल्हा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रत्येक रुग्णालयास्तरावर इन्स्टिट्युशनल डेथ ऑडीट कमिटी स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत शिवाय लवकर निदान लवकर उपचारावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

central health ministry praises state and measures taken during corona

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasha Mukt Yuva For Viksit Bharat : ड्रग्सविरोधात देशव्यापी अभियान; पंतप्रधानांचे तरुणांना आवाहन, म्हणाले- व्यसन स्वप्न उद्ध्वस्त करते

Dombivli: डोंबिवलीकरांसाठी जलवाहतुकीचा नवा पर्याय, रो-रो सेवा सुरू करणार, कधीपासून? महत्त्वाची माहिती समोर

Abhijit Dipkeच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह? RTI कार्यकर्त्याची तक्रार, दीपकेंचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : पोलीस कॉन्स्टेबल आणि दोन स्थलांतरित मजुरांच्या हत्यांना जबाबदार कोण? फारुख अब्दुल्लांचा सवाल

Sakal Foundation Day: शेती-उद्योगांच्या संतुलनातून शाश्वत विकास शक्य : प्रा. एस. महेंद्र देव; ‘सकाळ’चा ४६ वा वर्धापन दिन दिमाखात

SCROLL FOR NEXT