Central Railway Service Affected due to problem on railway track breaks
Central Railway Service Affected due to problem on railway track breaks 
मुंबई

मध्य रेल्वेने पुन्हा दिला दगा; मुंबईकर हैराण

वृत्तसंस्था

मुंबई : हल्ली मध्ये रेल्वेचा खोळंबा हा नेहमीचाच झालेला असून, आजही (ता. 17) सकाळपासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सायन आणि माटुंगा स्थानकादरम्याम रेल्वे रूळांना तडे गेल्याने ही वाहतूक खोळंबली, त्यामुळे सीएसएमटीकडे येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची वाहतूक खोळंबली आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मागच्या आठवड्यातच दोन ते तीन वेळा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. एकदा रेल्वेला तडा गेल्याने व दुसऱ्यांदा रेल्वेगेटला डम्परने धडक दिल्याने ही वाहतूक ठप्प झाली होती.

मागच्याच आठवड्यात टिटवाळा-खडवली ट्रॅकवर रेल्वे रूळाला तडा गेल्याने ही रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. अलीकडच्या काळात रेल्वे रूळाला तडे जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांचा जीव धोक्यात आहे, लवकरात लवकर हा प्रश्न मिटावा अशी मागणी प्रवासी करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: गुजरातला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का! सलामीवीर स्वस्तात बाद

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : माढा येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटीलांचा भाजपा उमेदवाराला पाठिंबा

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT