मुंबई

1 ऑक्टोबरपासून मध्य रेल्वे महिला विशेष लोकल सोडणार; गाड्यांची संख्याही वाढवली

रविंद्र खरात

कल्याण - लॉकडाऊन शिथिल होत असल्याने कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी वर्गासाठी राज्य सरकारने 423 उपनगरीय रेल्वे सेवा सुरू केली आहे. यात गर्दी  न करता, सोशल डिस्टंसिंग ठेवणे अपेक्षित आहे. परंतु अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढत असल्याने, मध्य रेल्वेेने 1 ऑक्टोबर पासून दैनंदिन विशेष महिला विशेष ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उपनगरीय गाड्यांची संख्या 423 वरून 431 वर इतकी होणार आहे

मध्य रेल्वे सुरू करणार असलेल्या अतिरिक्त 8 सेवांचा तपशील: 

मेन लाइन ( मध्य रेल्वे )

कल्याण येथून 4 सेवा (2 डाउन व 2 अप)

1 अप महिला विशेष कल्याण येथून सकाळी 8 वाजून 25 मिनिटाने सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 9 वाजून 34 मिनिटाला वाजता पोहोचेल

1 डाउन महिला विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 6 वाजून 35 मिनिटाला ( 18.35 ) सुटेल आणि कल्याण येथे 7 वाजून 44 मिनिटाला ( 19.44 ) वाजता पोहोचेल.

डाउन विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 9 वाजून 45 मिनिटाला सुटेल व कल्याण 10 वाजून 50 मिनिटाला वाजता पोहोचेल .

अप विशेष 4 वाजून 10 मिनिटाला ( 16 .10 ) वाजता कल्याण येथून सुटेल आणि 5 वाजून 16 मिनिटाला ( 17.16 ) वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

(या विशेष सेवा फक्त भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, दिवा आणि डोंबिवली येथे थांबतील)

ट्रान्सहार्बर लाइन 

4 सेवा (2 डाउन व 2 अप) ठाण्याहून <-> पनवेल जाण्या/येण्यासाठी

पनवेल विशेष ठाणे येथून 9 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 9 वाजून 52 मिनिटाला पोहोचेल

पनवेल विशेष ठाणे येथून 6 वाजून 30 मिनिटाला ( 18 .30 ) सुटेल आणि पनवेल येथे 7 वाजून 24 ( 19.24 )मिनिटाला पोहोचेल .

ठाणे विशेष पनवेल येथून 7 वाजून 55 मिनिटाला सुटेल आणि ठाणे येथे 8 वाजून 50 मिनिटाला पोहोचेल

ठाणे विशेष पनवेल येथून 5 वाजून 20 ( 17.20 ) सुटेल ठाणे येथे 6 वाजून 15 ( 18.15 ) मिनिटाला पोहोचेल

(ही विशेष जलद असेल आणि फक्त रबाळे, कोपरखैरणे, तुर्भे, जुईनगर, नेरूळ आणि बेलापूर येथे थांबेल)

मध्य रेल्वेवरील विशेष उपनगरी गाड्या आणि स्थानके नियमित स्वच्छ व योग्य प्रकारे निर्जंतुक केले जातात.
महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेल्या सर्व प्रवाशांना सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळावेत व रेल्वे स्टेशनवर जाताना आणि विशेष उपनगरी गाड्यांमधून प्रवास करताना मास्क घालावे.असे आवाहन मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे 

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपुरात एकाच कुटुंबातील ५ जण बेपत्ता, शेवटचं लोकेशन पुणे; १० दिवसांपासून शोध सुरू

Ketan Agrawal Case : पुण्यातील लोहगड केतन अग्रवाल प्रकरणानंतर 'राष्ट्रीय पुरुष आयोग' स्थापन होणार?, राज्यसभेत पडसाद; भाजप खासदारांकडून मागणी

Marathi Live Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये बुद्ध लेणी परिसरातील धबधबा पुन्हा प्रवाहित

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढचे ७२ तास महत्वाचे, कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

SCROLL FOR NEXT