मुंबई

सीईटी परीक्षा यंदा दोन गटांत

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमांत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन वेगवेगळ्या परीक्षांना सामोरे जावे लागू नये यासाठी पीसीएमबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र) या विषयांची एकच परीक्षा घेण्यात येत असे. पंरतु, एप्रिलमध्ये होणाऱ्या सीईटीत हा गट रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. त्याऐवजी पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) आणि अभियांत्रिकीसाठी पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) अशा परीक्षा २०२० मध्ये घेण्यावर प्रवेश नियामक प्राधिकरणाने (एआरए) शिक्कामोर्तब केले आहे.

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्यात येतात. राज्यातील काही वैद्यकीय अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्यासाठी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) या गटातून आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) या गटांतून परीक्षा घेण्यात येतात. त्याचबरोबर गतवर्षी दोन्ही अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्यांची पीसीएमबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र) या विषयाची एकच परीक्षा घेतली जात होती. 

पुढील वर्षी म्हणजेच एप्रिलमध्ये पीसीएमबी या गटाची परीक्षा न घेण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. एकत्रित ग्रुपचा पर्याय बंद केल्यामुळे दोन वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागणार आहेत. दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्कात कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही. दोन्ही परीक्षांसाठी वेगवेगळे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना भरावे लागणार असल्याचेही सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. 

वैद्यकीय अभ्यासक्रमांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पीसीबी आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पीसीएम अशा वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतील. दोन्ही अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना दोन्ही गटांच्या परीक्षा द्याव्या लागतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्षेत्र सुरुवातीलाच पक्के करावे, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे. 

विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार निर्णय 
एमएचटी-सीईटी १३ ते १७ एप्रिल आणि २० ते २३ एप्रिल या कालावधीत घेण्यात येईल. परंतु, या तारखांना कोणती परीक्षा घेण्यात येईल, याचा अद्याप निर्णय झालेला नाही. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार पीसीबी आणि पीसीएम यापैकी कोणत्या गटाची परीक्षा अगोदर घ्यायची, याचा निर्णय घेण्यात येईल, असे सीईटी सेलमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT