File Photo 
मुंबई

ड्रायव्हिंग स्कूलमधील गैरप्रकारांना चाप

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार राज्यातील मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या चालकांना आता सर्व प्रकारची माहिती ऑनलाईन भरावी लागेल. त्यामुळे नवीन वाहनचालकांच्या कौशल्य चाचणीत पारदर्शकता येईल; तसेच गैरप्रकारांना आळा बसणार आहे.

मोटार ड्रायव्हिंगच्या स्कूलच्या माध्यमातून नवीन वाहन चालक परवाना काढण्यासाठी "रिफ्रेशर कोर्स' आणि कौशल्य चाचणी अनिवार्य असते. त्यासाठी क्र. 5 आणि 5 अ हे फॉर्म भरावे लागतात. या प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याचे बोलले जाते. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि मोटार ड्रायव्हिंग स्कूलचालकांचे लागेबांधे असल्याने नवीन वाहन चालकाची चाचणी न घेताच परवाना दिला जातो, असे आरोपही केले जातात. 

आता नव्या मोटार वाहन कायद्यातील तरतुदींच्या आधारे राज्य परिवहन विभागाने मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या चालकांना ऑनलाईन माहिती भरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे नवीन वाहन चालकांचे कौशल्य चाचणी अर्जही ऑनलाईन भरावे लागणार आहेत. त्यासाठी आरटीओ कार्यालयांनी प्राधिकृत केलेल्या मोटार ड्रायव्हिंग स्कूलना ऑनलाईन युजर आयडी दिले जातील. सारथी 4.0 प्रणालीवर क्र. 5 आणि 5 अ या नमुन्यांत अर्ज भरणे अनिवार्य असेल. 

या बदलामुळे समोटार ड्रायव्हिंग स्कूलचे कामकाज पारदर्शक होईल आणि गैरप्रकारांना आळा बसेल, असा विश्‍वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

मोटार ड्रायव्हिंग स्कूलची माहिती ऑनलाईन भरण्यासाठी राष्ट्रीय सूचना केंद्राने प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या कामकाजात पारदर्शकता येईल. 
- शेखर चन्ने,
राज्य परिवहन आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणातील आरोपीवर सर्व सात गुन्हे सिद्ध झालेत- न्यायाधीश

Palghar: पालघर बनणार चौथी मुंबई ! गेमचेंजर प्रकल्पांना गती येणार, कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Malware Alert : लॅपटॉप-कॉम्प्युटरवर WhatsApp वापरताय? CERT-In ने दिला गंभीर इशारा, 'हा' मेसेज बघताच बँक अकाउंट होईल रिकामं

Nasrapur Case Verdict : नसरापूर हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? आज न्यायालयाचा अंतिम निकाल

Shaktipeeth Highway : अदानी-अंबानींसाठी सुपीक जमीन जाणार? 'शक्तिपीठ' महामार्गावरून सांगलीतील शेतकऱ्यांचा एल्गार, जिल्हा परिषदेवर वाढला दबाव

SCROLL FOR NEXT