Uddhav thackeray faction symbol  esakal
मुंबई

Uddhav Thackeray : राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता; उद्धव ठाकरेंचं भाकीत

शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचं भाकीत शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी याबाबत माहिती दिली. (Chance of mid term elections in Maharashtra Prediction of Uddhav Thackeray)

कायंदे म्हणाल्या, आपल्याला माहिती आहे की शिवसेनेची पहिल्यापासूनची बांधणी अशी आहे की, मुंबईतले जे पदाधिकारी असतात त्यांना जे पक्षाचे महत्वाचे निरोप असतात ते संपर्क प्रमुखांना पाठवले जातात. त्यानुसार आजची बैठक झाली. पंतप्रधानांनी महाराष्ट्रासाठी काही खास पॅकेज जाहीर केले आहेत. यामुळं महाराष्ट्रात मध्यावती निवडणूक जाहीर होण्याची शक्यता उद्धव ठाकरेंनी वर्तवली आहे. कायमचं महाराष्ट्र-गुजरात असा वाद निर्माण करुन भाजपकडून मतांचं राजकारण केलं जात आहे, असा आरोपही यावेळी कायंदे यांनी केले आहेत.

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले, एकूण परिस्थिती पाहता शिवेसेनेचा आढावा घेण्याचं काम सुरु आहे. पण आता जनतेत काम करणारी मंडळी आता कोणीच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळं शिवेसना आता द्विधा मनस्थितीत आहे, त्यामुळं आपले कार्यकर्ते टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारची वातावरण निर्मिती करायचं काम सध्या उद्धव ठाकरे गटाकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

Marathi News Live Updates: राहुल गांधींचा आठ तासांपासून ठिय्या

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

SCROLL FOR NEXT