पनवेलमध्ये लॉकडाऊन नियमात बदल; '...या' गोष्टींसाठी असेल परवानगी! 
मुंबई

पनवेलमध्ये लॉकडाऊन नियमात बदल; 'या' गोष्टींसाठी असेल परवानगी!

दिपक घरत

पनवेल : कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता पालिकेच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमात पनवेल पालिकेने पुन्हा एकदा बदल केलाय. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सामाजिक अंतर राखत भाजीपाला, चिकन, मटण, मच्छी, फळे, बेकरी आणि किराणा दुकानांतून काऊंटर सेल करण्यास परवानगी दिली असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतरही रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने, लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनची अंमलबजावणी कशा रीतीने केल्यास रुग्णसंख्या आटोक्यात येऊ शकेल, याबाबत संभ्रमात असल्याचे वारंवार बदलण्यात येणाऱ्या निर्णयावरून पाहायला मिळत आहे. कोरोना काळात वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याकरिता पालिका प्रशासनाच्या वतीने सुरुवातीला 3 जुलैपासून 14 पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. 10 दिवसांच्या लॉकडाऊननंतरही रुग्णसंख्या आटोक्यात न आल्याने लॉकडाऊनच्या कालावधीत 24 जुलैपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेत जीवनावश्यक वस्तूंच्या नावावर किराणा सामान, भाजीपाला, चिकन, मटण तसेच मच्छी व फळांची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देत काऊंटर विक्रीला पालिकेच्या वतीने परवानगी देण्यात आली आहे. 

यापुर्वी जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावावर नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असल्याचे लक्षात आल्याने दुकाने सुरू ठेवून काऊंटर विक्री करण्याचा निर्णय फिरवत केवळ घरपोच सेवा देण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता पालिका प्रशासनाने तिसऱ्यांदा आपल्या निर्णयात बदल करत सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सामाजिक अंतर राखत भाजीपाला, चिकन, मटण, मच्छी, फळे, बेकरी आणि किरणा दुकानांतून काऊंटर सेल करण्यास परवानगी दिली असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
-----------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT