electric meter. 
मुंबई

वापरानुसारच वीजबिल आकारा; बेस्टसह खासगी वीज कंपन्यांकडे मागणी...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊनच्या दोन-तीन महिन्याच्या काळात शहरातील अनेक दुकाने-कार्यालये आदी बंद असल्याने बेस्ट उपक्रमाने त्यांना सरासरी वीजबिले न पाठवता प्रत्यक्ष वापराएवढीच बिले पाठवावीत, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. 

कोरोनाच्या फैलावामुळे व नंतर लॉकडाऊनमुळे मार्च ते जून पर्यंत शहरातील अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता जवळपास सर्वच दुकाने बंद होती. अजूनही मॉल, शॉपिंग सेंटर, सलून-ब्यूटी पार्लर, हॉटेल इ. जवळपास बंदच आहेत. मात्र त्यांना बेस्टतर्फे तसेच खासगी वीज कंपन्यांतर्फे सरासरी वापराइतकी, किंवा गेल्यावर्षीच्या उन्हाळ्यातील वापराएवढी वीजबिले पाठविण्यात आली आहेत. ही बाब चुकीची आहे, कारण सध्या दुकाने-कार्यालये बंद असल्याने त्यांचा वीजवापर जवळपास शून्य इतकाच आहे. त्यामुळे त्यांना किमान वापराची किंवा प्रत्यक्ष मीटर रीडिंग नुसार वापराची बिले द्यावीत. 

एकतर सध्या सर्वांचाच व्यवसाय बंद असल्याने दुकानदारांचे उत्पन्नाचे मार्ग बंद आहेत. तरीही दुकानाचे भाडे, नोकरांचा पगार व अन्य खर्च त्यांच्या अंगावर पडल्याने ते तोट्यात आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांवर जास्त भार न टाकता त्यांना सवलत द्यावी, अशी मागणी लोढा यांनी बेस्ट चे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्याकडे केली आहे. 

खरं पाहता सध्याच्या कठीण दिवसांत राज्य वीज मंडळासह टाटा पॉवर, अदाणी आदी खासगी कंपन्यांनीदेखील घरगुती आणि व्यावसायिक वीजबिले ही किमान रकमेनुसार आकारावीत, अशीही मागणी लोढा यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT