मुंबई

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना छात्रभारतीने पाठवला काळा आकाश कंदील

संजय शिंदे

मुंबई, ता. 14 : गेली 20 वर्ष झाली महाराष्ट्र शासनाच्या विनाअनुदानित धोरणामुळे राज्यातील हजारो शिक्षक आत्महत्या करत आहेत. परंतु सरकारला अजून ही पाझर फुटत नाही. केवळ लॉकडाऊनमध्ये 60 पेक्षा जास्त शिक्षकांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु सरकारला विनाअनुदानित शिक्षकांचे काहीही घेणं देणं दिसत नाही, असा आरोप करत आज छात्रभारतीने शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांना दिवाळी निमित्त काळा कंदील भेट म्हणून दिला आहे.  

यावेळी छात्रभारतीने सरकारवर अनेक आरोप केलेत. शिक्षण विभागाकडून शिक्षकांना केवळ खोटी आश्वासने देण्यात येतात. "शिक्षकांनी खितीही आंदोलने केलीत तरीही शासनाला पाझर फुटत नाही आणि कायम शिक्षकांची खोटी समजूत काढली जाते. हा खेळ गेली 20 वर्षांपासून सुरूच आहे. शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे आणि ते मोफतच दिले पाहिजे. परंतु सरकार राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा धडधडीत बंद करत आहे. गोरगरिबांचे शिक्षण संपवण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. विनाअनुदानित धोरणामुळे अनेक शिक्षकांनी आत्महत्या केलेल्या असतानाही सरकार थोडेही संवेदनशील होत नाही".   

असे अनेक आरोप करत सरकारच्या धोरणांचा आणि सरकारचा संघटनेतर्फे निषेध करण्यात आला आहे. सरकारने याप्रश्नी गांभीर्याने विचार करावा नाहीतर शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत शासनाचा निषेध म्हणून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना काळा आकाश कंदील पाठवण्यात आला आहे.

chatra bharati sends black dowali lantern to school education minister varsha gaikwad

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: 'पॅट कमिंस SRH संघात आला तरी ईशान किशनच हवा कर्णधार, कारण...', काव्या मारनला मिळाला सल्ला

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांसह जय पवार आणि पार्थ पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

नात्यांतील दुराव्याची हळवी कहाणी सांगणारे ‘बाप्या’मधील ‘एकाकी’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

Gas Pipeline Leak: छत्रपती संभाजीनगर तालुक्यात थरारक घटना; गॅस लाईन फुटल्याने आग, मोठा अनर्थ टळला..

Supreme Court: डीएनएत पिता नसल्यास मुलाच्या पालनपोषणासाठी पोटगी नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, काय होता खटला?

SCROLL FOR NEXT