File Photo
File Photo 
मुंबई

गुगलवरून शोधला सर्पमित्र; निघाला भामटा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गुगलवरून मिळालेल्या माहितीवर विश्‍वास ठेवणे भोईवाडा येथील व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले. घरात साप आढळल्यामुळे त्याने गुगलवर सर्पमित्राचा संपर्क क्रमांक शोधला. या तथाकथित सर्पमित्राने मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्‍लिक करून माहिती भरण्यास सांगून या व्यापाऱ्याला 36 हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी भोईवाडा पोलिस अधिक तपास करत आहेत. 

डोंगरी परिसरात राहणाऱ्या व्यापाऱ्याचे परळ भोईवाडा येथे कपड्यांचे दुकान आहे. हा व्यापारी रविवारी (ता. 12) सकाळी नेहमीप्रमाणे दुकानात आला. त्याला दुपारी 4 वाजता भावाच्या पत्नीचा फोन आला. घरात विषारी साप आल्यामुळे तातडीने सर्पमित्राला बोलवा असे तिने सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या या व्यापाऱ्याने मोबाईलवरून गुगलच्या मदतीने सर्पमित्राचा संपर्क क्रमांक शोधण्यास सुरुवात केली.

गुगलवर "ऍनिमल हॉस्पिटल परेल' असे नमूद केल्यानंतर त्याला एक हेल्पलाईन क्रमांक मिळाला. त्याने या क्रमांकावर संपर्क साधला असता समोरच्या व्यक्तीने ""मैं तुम्हारा फोन नंबर मेरे दोस्त को देता हूँ. वह आपको तुरंत कॉल करेगा और सभी जानकारी देगा'' असे सांगितले. त्यानंतर काही क्षणांतच या व्यापाऱ्याला अन्य मोबाईल क्रमांकावरून कॉल आला.

"मैं ऍनिमल हॉस्पिटल केअर सेंटर परेल से बोल रहा हूँ. सर आपको मैं एक लिंक भेज देता हूँ. उस पर आप दस रुपये भेज दो. यह हॉस्पिटल का प्रोसिजर है'' असे त्याने सांगितले. त्यानंतर या व्यापाऱ्याने मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्‍लिक केले व स्वत:चे नाव आणि मोबाईल क्रमांक टाकला. ऑनलाईन पेमेंट असल्यामुळे त्याने बॅंकेचा यूपीआय क्रमांक दिला आणि अवघ्या एका मिनिटात त्याच्या खात्यातून पहिल्यांदा 6000, दुसऱ्यांदा 29 हजार 999, तिसऱ्यांदा 700 रुपये काढण्यात आल्याचे संदेश मिळाले.

भामट्यांपासून सावधान 
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या व्यापाऱ्याने त्वरित बॅंकेशी संपर्क साधून खाते ब्लॉक केले. त्याने पुन्हा त्या क्रमांकावर वारंवार संपर्क साधला असता समोरील व्यक्ती सतत कॉल खंडित करत होती. त्यानंतर फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याने भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या गोंधळात त्या सापाचे काय झाले हे मात्र कळू शकले नाही. त्यामुळे गुगलवरून मिळालेली प्रत्येक माहिती खरी असते असे नाही; त्यामुळे अशा भामट्यांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Cheating by snake friend

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT