मुंबई

डोंबिवलीतील गुलाबी रस्त्याची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी 

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : डोंबिवली औद्योगिक परिसरातील गुलाबी रस्त्याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज या परिसराची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी इथे साफसफाई करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला.

औद्योगिक विभागातील फेज दोनमधील रस्त्यावर गुलाबी रंगाचे रसायन पसरल्याच्या घटनेला आता तीन दिवस झाले आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने हा रस्त्यावर पाणी टाकून तो धुण्याचा प्रयत्न केला; मात्र तो असफल ठरला. आज मुख्यमंत्री या परिसरात येणार असल्याने रंग काहीसा फिक्का दिसावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले. या रस्त्यावर माती टाकून तो रंग काढून टाकण्याचा प्रयत्न झाला.

या पाहणी दौऱ्यामुळे परिसरातील गटारांचीही सफाई करण्यात आली. कारखान्यातील रासायनिक सांडपाणी वाहून नेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असतानाही या गटारातील पाण्यात रसायने मिसळत असल्याचे या वेळी स्पष्ट झाले. गटारातील रसायनमिश्रित पाण्यामुळे त्याची सफाई करताना उग्र दर्प पसरला होता. हे पाणी काढण्यासाठी पंप लावण्यात आले होते. गटारातही अनेक प्रकारची रसायने मिसळत असल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे. औद्योगिक विकास मंडळ तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या बाबींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी अनेकदा केला आहे. मात्र सरकारी यंत्रणा याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. 

web title : Chief Minister inspects the pink road in Dombivali

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT