File Photo 
मुंबई

डॉक्टरांनो ताप, सर्दी, खोकल्यावर उपचार करू नका, पण दवाखाने सुरू करा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने त्याचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. कोरोनाच्या भीतीने खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले. अनेकवेळा आवाहन करूनही दवाखाने उघडले जात नसल्याने अखेर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ताप, खोकला, सर्दीवर उपचार करू नका पण आपले दवाखाने उघडा असे आवाहन पालिका आयुक्तांनी एका परिपत्रकाद्वारे केले आहे.

दवाखाने उघडले नाही तर साथ नियंत्रण कायदा आणि आयपीसी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या परिपत्रकानुसार रुग्णालयात गर्दी वाढणार असून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. हजारो लोकांचा जीव घेणाऱ्या या व्हायरसचे भारतातही शेकडो रुग्ण आढळून आले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई आणि महाराष्ट्रात आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पालिका आणि खासगी रुग्णालयांवरील ताण वाढत असताना खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले आहेत.

काही मेडिकल आणि खासगी रक्त चाचण्या करणाऱ्या लॅबही बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना वैद्यकीय उपचार मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवू नयेत नागरिकांच्या सुविधेसाठी दवाखाने उघडा असे आवाहन मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यांनी केले आहे. दवाखाने उघडले नाही तर कारवाईचा इशाराही दिला. मात्र त्यानंतरही डॉक्टरांनी दवाखाने उघडलेले नाहीत. 

आवाहन करूनही डॉक्टर आपले दवाखाने उघडत नसल्याने पालिका आयुक्तांनी त्यांना दिलेल्या साथ नियंत्रण कायद्यानुसार अधिकाराचा वापर करत एक परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार 13 मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथ रोग नियंत्रण कायदा लागू करण्यात आला आहे. त्यानंतर खासगी रुग्णालये, दवाखाने (ओपीडी), पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल स्टोअर्स बंद ठेवल्याने नागरिकांना त्रास होत आहे. त्यांना वैद्यकीय सेवा मिळण्यास अडचणी येत आहेत. यामुळे दवाखाने त्वरित उघडावेत.

ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे नसतील अशा रुग्णांनाचा रुग्णालयात, दवाखान्यात प्रवेश द्यावा. कोरोना सदृश्य आजार नसतील अशा रुग्णांची डॉक्टरांनी तपासणी औषध उपचार करावेत. ताप, खोकला, सर्दी असलेल्या रुग्णांना डॉक्टरांनी कोरोनाचे उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात पाठवावे असे परिपत्रकात म्हटले आहे.

अन्यथा कारवाई
डॉक्टरांना आवाहन करूनही दवाखाने, मेडिकल स्टोअर्स, पॅथॉलॉजी लॅब बंद आहेत. ते त्वरित उघडण्याचे आदेश देताना सबळ कारण न देता दवाखाने, मेडिकल स्टोअर्स, पॅथॉलॉजी लॅब बंद साथ नियंत्रण कायदा 1897 व आयपीसीच्या 188 कलमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल असे पत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT