मुंबई

चेंबूरकर गहिवरले; ऋषी कपूर यांच्याशी विशेष ऋणानुबंध

जीवन तांबे

चेंबूर, ता. 30 :  मुंबई उपनगरात चेंबूरमध्ये आर के स्टुडिओची वास्तू महामार्गावरून दिसताच आठवण येते ती राज कपूर आणि ऋषी कपूर यांच्या सिनेमांची. ऋषी कपूर यांनी आपल्या अभिनयाचा श्री गणेशाही येथूनच केला. त्यानंतर तब्बल 120हून अधिक चित्रपटात त्यांनी अभिनय केला. वयाच्या साठ वर्षांपर्यंत ते चेंबूरमध्येच वास्तव्याला होते. 1947 मध्ये चार एकर जागेवर राज कपूर यांनी ही वास्तु उभी केली. स्टुडिओ निर्माण केल्यानंतर परिसरातील नागरिकांना रोजगार मिळाला. तेव्हापासूनचे कपूर कुटुंबाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी या परिसरातील कामगारांना आपल्या स्टुडिओत तसेच घरीही आवर्जुन काम दिले. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये कपूर घराण्याविषयी विशेष आपुलकी आहे. त्यामुळे ऋषी कपूर यांच्या जाण्याने चेंबूरकरांचे डोळे आज पाणवले.

विक्रीनंतर आर के स्टुडिओ आता गोदरेज आर के झाला आहे.  या स्टुडिओच्या विक्रीनंतर ऋषी कपूर यांनी कामगारांच्या देणी स्वतः दिल्या. या स्टुडिओत राज कपूर होळी, गणेश उत्सव कपूर कुटुंब मोठ्या आनंदाने साजरे करीत. राज कपूर यांच्या निधनानंतर कपूर कुटंबीय होळी साधेपणाने साजरे करीत; मात्र  70 वर्षांपासून गणेश उत्सवाची परंपरा आजतागत सुरू होती. या उत्सवात ऋषी कपुर, रणधीर कपुर, नितु सिंग, राजीव कपुर व पूर्ण कपूर कुटुंब हिरिरीने भाग घेत व सर्व कामगारांसह आनंद लुटत. 

स्टुडिओत ते अखेरचे गणेश दर्शन

2019 मध्ये आर.के.स्टुडिओच्या शेवटच्या गणेशोत्सवादरम्यान ऋषि कपूर यांनी गणेशाचे दर्शन घेतले व भावुक होऊन सर्व कामगारांना अभिवादन केले व पुढील उपचारासाठी परदेशी रवाना झाले. तेव्हा आम्हा कामगारांना समजले की, साहेबांना कॅन्सर हा दुर्धर आजार झाला आहे. त्याच्याशी ते लढ़ा देत आहेत. आज ऋषि कपूरसाहेब गेल्याने आमच्या घरातील माणूसपण जपणारा एक सदस्य निघून गेल्याची खंत जाणवत आहे, अशा भावना कामगारांनी व्यक्त केल्या.  

सदा, ये काम तुमही करो!

चेंबूरचा आर. के. स्टूडिओ व कपूर फॅमिली म्हणजे आम्हा कामगारांचे आपुलकीचे घर. त्यात ऋषि कपूर हे आम्हा सर्व कामगारांची आस्थेने विचारपूस करायचे.  मी गेली 45 वर्षे माझ्या वयाच्या 18 व्या वर्षापासून स्टूडिओमध्ये सुतारकाम करत आहे. ऋषि कपूर व त्यांच्या मातोश्री कृष्णा कपूर हे घरातील फर्नीचरचे काहीही काम असेल तर 'सदा ये काम तुम ही करो', सांगायचे, अशी आठवण येथील रहिवासी सदानंद पिंपळकर यांनी सांगितली.  बाहेरगावी चित्रपटाच्या चित्रिकरण्यादरम्यान सर्व कामगारांची ऋषि कपूर विशेष काळजी घेत. वैद्यकिय मदत, काही घरगुती अडचण असल्यास आम्हाला तातडिने मदत करीत, असे त्यांनी सांगितले.  

क्रिकेट सामन्यांना मदत

ऋषी कपुर हे नेहमी आपुलकीने चौकशी करीत. राज कपूर व ऋषी कपुर क्रिकेटचे चाहते होते. त्यामुळे घाटला गावात राज कपूर नावाने क्रिकेट सामने भरविण्यात येत होते. त्याला मदत ऋषी कपूर करत.  मिथुन चक्रवर्ती या सामन्यांना आवर्जून उपस्थित रहायचे, अशी माहिती आर. के. स्टुडिओतील कामगार अनंत गुरव यांनी दिली.

citizens of chembur mourn in grief after sad demise of actor rishi kapoor

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT