london to india 
मुंबई

लंडनला अडकलेले नागरिक सुखरुप मुंबईत दाखल, 'वंदे भारत मिशन'ला सुरुवात

सकाळवृत्तसेवा

मुंबई :  लंडनमध्ये अडकलेल्या 325 भारतीयांना घेऊन स्पेशल विमान लंडनमधील हिथ्रो विमानतळावरुन मायदेशी दाखल झालं आहे. केंद्र सरकारच्या वंदे भारत मिशन अंतर्गत हे विमान आज मुंबईत पोहोचलं. रविवारी मध्यरात्री दीड वाजता पहिलं विमान मुंबई विमानतळावर दाखल झालं. या विमानातून आलेल्या सर्व प्रवाशांना विविध हॉटेल्समध्ये 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. 

लंडनमध्ये गेल्या दीड महिन्यापासून काही विद्यार्थी आणि यात्रेकरु अडकले होते. त्या सगळ्यांना मुंबईत आणण्यात आलं आहे. सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या अडकलेल्या सर्वांनी केंद्र सरकारकडे भारतात परत घेऊन जाण्यासाठी व्यवस्था करावी, अशी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीवरुन अखेर केंद्र सरकारनं वंदे भारत मिशन राबवलं आहे. या मिशन अंतर्गत लंडनहून पहिलं विमान आज सकाळी मुंबईत दाखल झालं. 

आज मुंबईत दाखल होणार आणखी तीन विमान 

परदेशात अडकलेले 813 भारतीयांना आज मायदेशात आणले जाईल. लंडनहून पहिले विमान दाखल झालं. त्यानंतर सिंगापूर आणि मनीला येथून दोन विमाने मुंबईत आज रात्रीपर्यंत दाखल होतील. सिंगापूरहून 243 प्रवाशांना घेऊन निघालेलं एक विमान दुपारी 12 वाजून 30 मिनिटांला मुंबईत पोहोचेल. तर तिसरे विमान मनीलाहून 241 प्रवाशांना घेऊन येणार विमान रविवारी रात्री 11 वाजता मुंबई एअरपोर्टवर दाखल होईल. 

भारतात 'वंदे भारत मिशन' 

परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी राबवण्यात आलेल्या वंदे भारत मिशनला आजपासून सुरुवात झाली आहे. विमान आणि जहाजातून जवळपास 15 हजार भारतीयांना टप्प्याटप्प्यानं आपल्या मायदेशी परत आणण्यात येईल. यासाठी विमानतळे आणि बंदरे पूर्णतः सज्ज केली आहेत. या लॉकडाऊन दरम्यान विदेशात जवळपास 2 लाख भारतीय अडकले आहेत. यापैकी 14 हजार 800 भारतीयांना वंदे भारत मिशन अंतर्गत भारतात आणलं जाणार आहे. जगभरातील एकूण 12 देशातून 64 विमानांद्वारे नागरिकांना भारतात आणलं जाईल. 

7 ते 13 मे या कालावधीत एअर इंडियाची 64 विमान आणि त्याची सहाय्यक एअर इंडिया एक्सप्रेस 12 देशांमधील अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणले जाणार आहे. या देशांमध्ये युएई, यूके, अमेरिका, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, मलेशिया, फिलीपिन्स, बांगलादेश, बहरीन, कुवैत आणि ओमानचा समावेश आहे.

Citizens stranded in London safely arrive in Mumbai, 'Vande Bharat Mission' begins

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT