मुंबई

घरगुती गणेशोत्सवासाठी पालिकेची 'ही' आहेत मार्गदर्शक तत्त्वे

पूजा विचारे

मुंबईः सध्या कोरोना व्हायरसनं थैमान घातल आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव सर्वाधिक झाला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊन काटेकोर पालन केले जाताहेत. अशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर कोणतेही सण आणि उत्सव साजरे करण्यात आले नाहीत. आता मुंबईकरांचा सर्वांत आवडता गणेशोत्सव यंदा साजरा करण्यात येणार नसून घरच्या घरी आणि साध्यापद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्यास सांगितलं आहे. काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही गणेशोत्सव साध्यापद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

आता बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने घरगुती गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. नागरिकांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर त्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. यापूर्वीच सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पालिकेनं मार्गदर्शक सूचना निश्चित केलीय. 

सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी बाप्पाचं विसर्जन घरीचं करावं किंवा शक्य असल्यास गणपती पुढच्या वर्षी विसर्जित करावा असं सुचवलं आहे. तसंच धातु किंवा शाडू (नैसर्गिक) च्या मातीची मूर्ती स्थापित करण्याचंही सुचवण्यात आलं आहे जेणेकरून घरीच विसर्जन होऊ शकेल. एखाद्या भाग सीलबंद झाल्यानंतरही नियमांचं पालन करण्याचं आवाहनही बीएमसीनं नागरिकांना केलं आहे. नियमांनुसार अशा भागात फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात येणारेय. 

महापालिकेनेही नागरिकांना मूर्तीची उंची दोन फूटांपेक्षा कमी ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसंच पाचपेक्षा कमी लोकांसह आगमन आणि विसर्जन मिरवणुका लहान ठेवण्यास सांगितलंय. 

मुंबई महापालिकेची मार्गदर्शक तत्त्वे

  • विसर्जन मिरवणुकीत भाग घेणार्‍या सर्व नागरिकांनी मास्क घालणं अनिवार्य आहे. तसंच फेस शिल्ड्स, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागेल. 
  • शाडू मातीची मूर्ती किंवा धातूची मूर्ती स्थापित करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून घरीच विसर्जन होऊ शकेल. 
  • शक्य असल्यास माघी गणेशोत्सवात किंवा पुढच्या वर्षी विसर्जन पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा. 
  • जर घरात विसर्जन शक्य नसेल तर लोक जवळच्या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करु शकतात.  विसर्जनासाठी नैसर्गिक तलाव किंवा समुद्रकिनार्यावर जाऊ नये. 
  • विसर्जन ठिकाणी विलंब होऊ नये म्हणून घरीच विसर्जन आरती करा. 
  • लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना विसर्जन मिरवणुकीपासून दूर ठेवले पाहिजे. 
  • जर एखादा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केल्यास रहिवाशांना नियमांचे पालन करावं लागेल.
  • कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ आवश्यक सेवांना परवानगी असेल आणि रहिवासी सीलबंद भागात प्रवेश करू शकत नाहीत किंवा बाहेर पडू शकत नाहीत.

Civic Body Guidelines Ganeshotsav At Home Ganesh Chaturthi 2020

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT