File Photo
File Photo 
मुंबई

अरे व्वा! दहावीच्या विद्यार्थ्याचे संशोधन तेही कोरोनाचा संसर्ग रोखणारे

सकाळ वृत्तसेवा

विरार : जगभरात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले असल्याने त्यावर उपाय शोधण्याचे काम युद्ध पातळीवर विविध देशातील संशोधक करत आहेत. विरार येथील शालेय विद्यार्थी हर्ष चौधरी याने व्हेंटिलेटेड मास्क तयार करून अनेकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या मास्क बरोबरच त्याने चेहऱ्यावर स्पर्श रोखणारे रिस्ट बँड हि तयार केला आहे. त्याच्या ह्या संशोधनाचा फायदा पोलिस, नर्स, डॉक्टर आणि दवाखान्यात काम करणाऱ्या कामगारांना होणार आहे.

विरार मधील नॅशनल इंग्लिश स्कुल मध्ये दहावीत शिकणाऱ्या हर्ष चौधरीच्या एका प्रयोगाची दखल खुद्द नासा नेही घेतली होती. हर्ष याला वडिलांनी त्याच्या साठी घरात प्रयोग शाळाच सुरु करून दिली आहे. हर्षने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वर संशोधन सुरु केले, तोंडावर असलेल्या मास्कमधून  थुंकी उडत असते तसेच उन्हामुळे गर्मी देखिल होत असते. म्हणून त्याने व्हेंटिलेटेड मास्क तयार केला आहे. हा मास्क सर्जिकल मास्क पासून बनवला जातो. तसेच मास्क थोडा फुगीर पद्धतीचा आणि नाकाच्या वरच्या बाजूने हवा तसा क्लिप द्वारे लावता येतो. मास्कच्या दर्शनी भागात कुलिंग फॅन लावला जातो. आणि या फॅनद्वारे आतल्या फुगीर भागात पंख्यातून आत बसवलेल्या छोट्या फिल्टर द्वारे ताजी हावा खेळती राहते. हा पंखा ठराविक काळानंतर स्वतः चालू बंद होऊ शकतो.

सध्या हा एक मास्क 150 रुपयांना पडतो परंतु याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यास त्याची किंमत कमी होणार असल्याचे हर्ष चौधरी यांनी सकाळशी बोलताना सांगितले. त्याचे संशोधन उपयोगी असले तरी त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यास त्याला अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे या मास्कच्या निर्मितीला शासनाची मदत मिळाल्यास मोठ्या प्रमाणात मास्कची निर्मीती केली जाऊ शकते असे हर्ष म्हणाला. 

असा आहे रिस्ट बॅंड
हर्ष याना चेहऱ्याला स्पर्श करण्यापासून रोखणारा रिस्ट बँड तयार केला आहे. हा रिस्ट बँड घातल्यानंतर आपण सातत्याने चेहऱ्याला होणार स्पर्श रोखू शकतो. या बँड मध्ये त्याने व्हायब्रेशन आणि बझर लावला आहे. त्यामुळे आपला हात चेहऱ्या जवळ गेल्यास त्यातून आवाज येतो. त्यामुळे आपण सावध होतो. हा बँड बनविण्यासाठी हर्ष याला 70 रुपये खर्च येत आहे.

Class X student research to prevent Corona spread

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT