मुंबई

`मुख्यमंत्री` उद्धव ठाकरे प्रथमच ठाण्यात 

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा ठाण्याला येणार आहेत. त्यांच्या हस्ते 6 फेब्रुवारी रोजी शहरातील किसनगर आणि हाजुरी येथील क्‍लस्टरचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. तसेच तीन हात नाक्‍याजवळील बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे लोकार्पण, अपंगांना स्टॉल आणि घरांच्या चाव्यांचे वाटप, प्रकल्पबाधितांना चाव्या वाटप, बीएसयूपीच्या घरांचे चाव्या वाटप आदी कार्यक्रम होणार आहेत. 

पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेसाठी क्‍लस्टरचा विषय हा महत्त्वाचा आहे. त्यामुळेच या क्‍लस्टरची पूर्तता करण्यासाठी सातत्याने प्राधान्य दिले जात आहे. क्‍लस्टरच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आतापासून कामाला लागले आहेत.

ठाण्यात क्‍लस्टरच्या मुद्द्यावरून चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला होता. नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीबरोबरच यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये देखील क्‍लस्टर हाच प्रचाराचा मुद्दा होता. गेले अनेक वर्ष सर्वसामान्य ठाणेकर या क्‍लस्टर योजनेच्या अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत होते. 

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे गृहनिर्माण अशी ठाण्यात दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यामुळे क्‍लस्टरचा मार्ग अधिक मोकळा होणार असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यात तीन हात नाका येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे लोकार्पण, बीएसयूपी योजनेतील लाभार्थ्यांना चावी वाटप, अपंगांना सदनिकांचे आणि स्टॉलचे वाटप आणि प्रकल्पबाधित नागरिकांना देखील यादिवशी सदनिकांचे वाटप करण्यात येणार आहे. या सर्व विकासकामांचे उद्‌घाटन झाल्यानंतर पालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणोकर नाट्यगृहात मुख्य कार्यक्रम होऊन तेथे उद्धव ठाकरे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT