Uddhav thackeray on dharmaveer 
मुंबई

'मी बाळासाहेबांना...', धर्मवीर सुरू असतानाच उद्धव ठाकरे उठले आणि निघाले!

सकाळ डिजिटल टीम

राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्यादरम्यान ठाण्यातील कट्टर शिवसैनिक असलेल्या आनंद दिघेंवर आधारित धर्मवीर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. शुक्रवारी प्रदर्शित झाल्यानंतर या वीकएंडला नरिमन पॉईंटच्या आय़नॉक्सला स्पेशल शोचं आयोजन करण्यात आलं होतं. (Uddhav Thackeray Watched Dharmaveer)

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपटाला उपस्थिली लावली. मात्र चित्रपट संपण्याआधीच उद्धव ठाकरे थिएटरमधून बाहेर पडले. सर्वांना त्यांचा पूर्वनियोजित दौरा असल्याचं वाटलं. मात्र ठाकरे यांनी बाहेर येताच माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि सत्य समोर आलं. (Dharmaveer Cinema)

मी शेवटचा प्रसंग पाहू शकलो नाही, असं म्हणत मुख्यमंत्री चित्रपटगृहाबाहेर पडले. आनंद दिघे गेल्यानंतर मी व्यथित झालेल बाळासाबहेब पाहिले असल्याची आठवण त्यांनी शेअर केली. आनंद दिघे आमच्यातून जाणं हा आमच्या मनावर आघात आहे, असं त्यांनी म्हटलं. शिवसैनिकांवर प्रेम करणारे बाळासाहेब आणि तसेच शिवसैनिकांवर प्रेम करणारे आनंद दिघे आम्हाला माहिती आहेत. त्यामुळे मी शेवटचा प्रसंग पाहू शकलो नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद देणारे आनंद दिघे प्रसाद ओक (Prasad Oak) यांनी पुन्हा जीवंत केले आहेत. त्यांनी अप्रतिम भूमिका केली आहे. विशेषतः आनंद दिघे यांच्या बारीकसारीक लकबी त्यांनी कशा आत्मसात केल्या मला कल्पना नाही पण असं कुठेही जाणवलं नाही. सर्वांनी हा चित्रपट आवश्य पहावं हे केवळ मी चित्रपट चालावा यासाठी नाही तर आयुष्य कसं जगावं यासाठी हा चित्रपट पहावा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रत्येक शहरात एक आनंद दिघे असावेत हे या चित्रपटातील एक वाक्य फार महत्वाचं आहे. ज्यावेळी आपल्या शहरात आनंद दिघे असतील असं केवळ शहरातील लोकांनाच नाही तर गुंडानाही वाटेल त्यावेळी आपल्याला तो आनंद दिघे नावाचा धाक, दरारा जाणवेल. सहाजिकच एक शिवसैनिक कसा असावा? निष्ठा म्हणजे काय, श्रद्धा म्हणजे काय? हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर कळेल.

चित्रपटाचा खरा भाग आम्ही प्रत्यक्ष पाहिला. शिवेसना आणि आनंद दिघे यांचं नात अधिक घट्ट होतं, असे शिवसैनिक मला लाभले हे माझं भाग्य आहे. धर्मनिष्ठा, संघटना आणि आपली जनता यांच्यावर निस्सिम प्रेम करणारे हे कार्यकर्ते आहेत. पुढे जाताना नेमकं गुरु-शिष्याचं नातं कस असावं हेच आपल्याला पुढे नेणारं आहे, असंही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT