Mumbai News
Mumbai News  
मुंबई

Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची माहिती, ट्राफिकमधून होणार सुटका!

Sandip Kapde

Mumbai News :   मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील गिरगाव चौपाटीते प्रियदर्शनी पार्क या दुसऱ्या बोगद्याचे खनन काम पूर्ण झाले. या कामाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहीणी केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज नाव दिलेला कोस्टल हायवेच्या दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. मुंबईकरांना आता ट्राफिकमधून दिलासा मिळेल. हा महत्त्वाचा प्रकल्प आहे.

गिरगाव चौपाटी ते प्रयिदर्शनी पार्क दुसऱ्या बोगद्याचं खनन पूर्ण झाले आहे. राज्यातील प्रत्येक प्रकल्पाला मोदींचे पाठबळ आहे. मुंबईकरांसाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्वाचा आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

गिरगाव ते प्रियदर्शनी पार्क या कोस्टल रोड अंतर्गत दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. हा देशातील सर्वात लांब सागरी बोगदा (इंडिया फर्स्ट-एव्हर अंडरसी ट्विन टनेल) आहे, जो लवकरच मुंबईकरांना भेट म्हणून दिला जाणार आहे.

२.०७ किमी लांबीच्या दुसऱ्या बोगद्याचा १ किमी समुद्राखाली बांधला आहे. मलबार हिल बाजूच्या विव्हिंग डेकपासून मफतलाल क्लबपर्यंत समुद्राखाली बांधला गेला आहे. दुसरीकडे, मलबार हिलच्या टेकडीखाली खडक कापून एक किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात आला आहे.

समुद्राखालून बोगदे बनवताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असला तरी, टेकडीखालून बोगदे बनवणे हे सर्वात आव्हानात्मक होते. असे असतानाही टीबीएम मशिनच्या मदतीने हे काम पूर्ण करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT