मुंबई

24 तासात 1 हजार 400 सॅम्पल टेस्ट करणारी 'ही' अत्याधुनिक मशीन अखेर भारतात दाखल 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कमी वेळात अधिक चाचण्या करणे आता शक्य होणार आहे. कमी वेळेत अधिक चाचण्या करण्याच्या उद्देश्याने केंद्र सरकारने 'कोबास 6800' मशीन मागवली आहे. या मशीनच्या माध्यमातून अधिक चाचण्या करता येणार आहेत. या मशीनचा वापर मुंबईत केल्यास कमी वेळात अधिक टेस्ट करता येणार आहेत.

अत्याधुनिक कोबास 6800 मशीनच्या साहाय्याने झटपट चाचण्या करणे शक्य होणार आहे. मशीनमुळे 24 तासात 1 हजार 400 सॅम्पल टेस्ट करण्याची या मशीनची क्षमता आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी नुकतेच हे मशीन नॅशनल स्टडीज फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) कडे सुपूर्द केले. झटपट कोरोना चाचण्या होणारे आणि भारतात दाखल झालेले हे पाहिलेच अत्याधुनिक मशीन आहे.

एनसीडीसी सेंटरमध्ये ठेवण्यात आलेले हे मशीन 'रोबोटिक्स'ने परिपूर्ण असल्याने स्वयंचलित आहे. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित सॅम्पलची चाचणी करणे शक्य झाले आहे. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना  बाधा होण्याचा धोका आता निर्माण होणार नाही. तसेच वेळेची मोठी बचत देखील होणार आहे.

कोबास 6800 मशीनला टेस्टिंगसाठी न्यूनतम बीएसएल 2 आणि 'कंट्रोल लेव्हल'ची लॅब आवश्यक आहे. कोबास 6800 मशीनच्या साहाय्याने हेपीटायसिस बी ऍण्ड सी, एचआयव्ही, एमटीबी, पॅपिलोमा, सीएमव्ही, क्लँमाइडिया, नेयसिरेमिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांची चाचणी ही करते.

देशात कोरोना संसर्गाचा कहर दिवसेंदिवस दिवस वाढत आहे. आतापर्यंत 20 लाख लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. दररोज साधारणता 1 लाख नमुन्यांची चाचणी करण्यात येत आहे. कमी वेळात आणखी चाचण्या करणे गरजेचे आहे. करण जेवढ्या चाचण्या होतील तेव्हडी परिस्थिती हाताळणे सोपे जाईल.

देशभरात कोरोना बाधितांची संख्या 80 हजाराच्यावर पोचली आहे. त्यामुळे सरकार ही चिंतेत आहे. राज्यात खास करून मुंबईत ही कोरोना संसर्ग वेगाने पसरतोय. राज्यात 33 हजाराच्या वर रुग्णांची संख्या पोहोचली असून मृतांचा आकडा ही 1,200 वर गेला आहे. तर मुंबईत रुग्णांचा आकडा 20 हजाराच्या वर पोहोचला आहे तर मृतांचा आकडा 734 झाला आहे. मे महिन्यांनंतर जून महिना निर्णायक ठरणार आहे. अश्या वेळी कमी वेळात अधिक चाचण्या केल्यास परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल.

cobas 6800 finally arrived in india now testing of 1400 samples in 24 hours is possible

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT