महिलेच्या पोटात कोकेन अन्‌ कंडोम!  
मुंबई

महिलेच्या पोटात कोकेन अन्‌ कंडोम!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आलेल्या बोलिव्हियातील महिलेच्या पोटातून कोकेन भरलेले १३ कंडोम काढण्यात आले. या सुमारे ३०० ग्रॅम कोकेनची किंमत एक कोटी रुपये आहे. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) या महिलेला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली.

डीआरआयने या बोलिव्हियन महिलेला कोकेनसह शुक्रवारी अटक केली. रिबेरा अनेज डिलिसिया (५४) ही महिला ब्राझीलमधील साओ पावलो येथून आदिस अबाबामार्गे २ मार्चला मुंबई विमानतळावर आली होती. डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी या महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिच्या पोटात कोकेन असल्याचा संशय अधिकाऱ्यांना होता. त्यामुळे जे. जे. रुग्णालयात तिचा एक्‍स-रे काढण्यात आला व सोनोग्राफी करण्यात आली. त्या वेळी तिच्या पोटात कॅप्सूलसारख्या वस्तू असल्याचे आढळले.

त्यानंतर डॉक्‍टरांनी तिच्या पोटातून १३ कंडोम बाहेर काढले. त्यांत कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. त्यासाठी डॉक्‍टरांना दोन दिवस प्रयत्न करावे लागले. कंडोममध्ये लपवलेल्या ३०० ग्रॅम कोकेनची किंमत एक कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ब्राझीलमधील अमली पदार्थ तस्कराने पाठवलेले हे कोकेन तिला मुंबईतील सांताक्रूझ येथील दोन नायजेरियन नागरिकांपर्यंत पोहोचवायचे होते. अमली पदार्थ पोहोचवण्यासाठी तिला मुंबई किंवा मकाऊ असे पर्याय देण्यात आले होते. त्यानुसार एक दिवस आधी कोकेन भरलेले १३ कंडोम गिळून ती मुंबईत आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Money Lending Law: महाराष्ट्रातील सावकार अडचणीत येणार! कायद्यात मोठा बदल होणार; महाराष्ट्र सरकार महत्त्वाचं पाऊल उचलणार

T20 World Cup 2026: पाकिस्तानी सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये अव्वल अन् विकेट्स घेणाऱ्यांमध्ये अमेरिकन टॉपर! भारतीय कुठेत?

EKA Mobility : इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, स्त्रीसन्मान अन् तरुणांना रोजगार; EKA Mobility चा तिहेरी विजय! वाचा सविस्तर यशोगाथा

Virar News : भाजपला धक्का! भाजप महिला मोर्चा प्रमुख ॲड. साधना धुरी यांचा बविआत प्रवेश

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेत नमाज पठण झाल्याने उफाळला वाद

SCROLL FOR NEXT