मुंबई

ठाण्यातील क्‍लस्टरवरून सेना-भाजमध्ये शीतयुद्ध!

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाण्यातील महत्त्वपूर्ण क्‍लस्टर प्रकल्पाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली होती. त्याबद्दल शिवसेनेच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आभाराचे बॅनर लावून समाजमाध्यमांवर पोस्ट टाकल्या; मात्र आता क्‍लस्टर प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचेच फडणवीसांना निमंत्रण देण्यास शिवसेना का विसरली, असा प्रश्न भाजपचे आमदार व ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केला.

आवश्‍यक मंजुरी मिळाली नसतानाही क्‍लस्टर उद्‌घाटनाची लगीनघाई का, अशी विचारणाही त्यांनी केली आहे. ठाणे शहर अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आमदार निरंजन डावखरे यांनी पहिल्यांदा पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते क्‍लस्टर प्रकल्पाच्या उद्‌घाटनावरून बोलत होते. या वेळी आमदार संजय केळकर, नगरसेवक संदीप लेले, कृष्णा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मढवी आदी उपस्थित होते. 

क्‍लस्टरच्या मंजुरीवेळी शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे ठिकठिकाणी पोस्टर्स लावले होते. तसेच विद्यमान नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेत 18 सप्टेंबर 2019 ला पत्रकार परिषद घेतली होती. त्या वेळी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानणाऱ्या शिवसेना नेत्यांना आता क्‍लस्टर प्रकल्पाच्या उद्‌घाटनाचे निमंत्रण देण्यास विसर का पडला, असा सवाल डावखरे यांनी केला.

शिवसेनेला श्रेय घ्यायचे, तर त्यांनी घ्यावे. यापूर्वी महापालिकेच्या काही कार्यक्रमांना एक दिवस आधी मान्यवरांना निमंत्रणे देण्यात आल्याच प्रकार घडलेला आहे. उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाला अजून तीन दिवसांचा कालावधी आहे. तोपर्यंत शिवसेनेच्या नेत्यांना सद्‌बुद्धी होईल, असा टोलाही डावखरे यांनी लगावला. 

क्‍लस्टर प्रकल्पाच्या यूआरपीला (अर्बन रिन्यूअल प्लॅन) मंजुरी मिळालेली नसून, अद्यापि आयओडी (इंटिमेशन ऑफ डिसऍप्रूव्हल) देण्यात आलेली नाही. त्यामुळे भूमिपूजन करण्यासाठी लगीनघाई का केली जाते? याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले.

त्याचबरोबर गावठाणे व कोळीवाडे वगळण्याबाबात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करून भूमिका जाहीर करावी, असे आवाहन डावखरे यांनी केले. क्‍लस्टरबाबत सुस्पष्टता हवी. नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होता कामा नये, अशी भूमिका मांडत डावखरे यांनी ठाणे महापालिकेच्या संकेतस्थळावर क्‍लस्टरबाबत कोणतीही माहिती नसल्याकडे लक्ष वेधले. 

सोन्यासारख्या योजनेची एसआरए होईल! 
ठाण्यातील क्‍लस्टरचे देवेंद्र फडणवीस हे भाग्यविधाते आहेत. त्यामुळे त्यांना शिवसेनेने सन्मानाने बोलवायला हवे. मात्र, शिवसेनेचा स्वभाव केले नसल्याचेही श्रेय घेण्याचा आहे. अन्‌ कोणी केले त्याला विसरून जावे, असा आहे. त्यांच्यामुळे त्यांनी फडणवीसांना निमंत्रित केलेले नाही, असा टोला आमदार संजय केळकर यांनी लगावला. क्‍लस्टरची अंमलबजावणी संपूर्ण पूर्तता करूनच करावी. अन्यथा, सोन्यासारख्या योजनेची एसआरए होईल, असे भाकीत केळकर यांनी केले. 

भाजपला क्‍लस्टर हवी की नको : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे 
ठाण्यात क्‍लस्टर योजना लागू करण्यासाठी कोणी किती प्रयत्न केले, याची सर्व ठाणेकरांना माहिती आहे. हा लढा सर्वात प्रथम शिवसेनेने सुरू केला आहे. पावसाळ्यात अनधिकृत धोकादायक इमारत कोसळून माणसे मृत्युमुखी पडत असल्याने ही योजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शिवसेनेच्या आंदोलन आणि पाठपुराव्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी क्‍लस्टरला मंजुरी दिली होती. तसेच या योजनेत काही त्रुटी असल्यास त्या दूर करता येतील. ही योजना लाखो कुटुंबांना आसरा देणारी ठरणार आहे. अशा वेळी भाजपच्या नेत्यांनी या योजनेला नक्की पाठिंबा आहे की विरोध आहे, हे स्पष्ट करणे गरजेचे आहे. शिवसेना क्‍लस्टरच्या माध्यमातून धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घर देण्यास बांधील आहे. अशी घरे नागरिकांना उपलब्ध झाल्यानंतर कारण नसताना विरोध करणाऱ्यांचा विरोध आपोआप बंद होणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Land Scam: सरकारी जमिनीवर माफियांचा डोळा! पुण्यात कृषी विभागाच्या जमिनीचा मोठा अपहार; अधिकारीही अडचणीत

Latest Marathi News Live Update : मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी मंगळवारी होणार निर्णय

बाथरुमचा पाइप डायरेक्ट समुद्रात... वनिताच्या घरात घुसलेलं २६जुलैच्या पुराचं पाणी; म्हणाली, 'शाळेत जायला निघालेलो आणि...

Eknath Shinde Vs BJP : कोकणात एकनाथ शिंदे स्वबळावर लढणार, दीपक केसरकरांनी भाजपला इशारा देत विजयाचं गणित सांगितलं...

Malkapur Accident : 'ट्रकच्या धडकेत तिघे गंभीर जखमी'; मलकापूरनजीक अपघात, दोन महामार्ग कर्मचाऱ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT