file photo 
मुंबई

मुंबईकर कुडकुडणार!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईकरांना 48 तास कडाक्‍याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे. पुढील दोन दिवस किमान तापमान 14 अंश आणि कमाल तापमान 27 अंश सेल्सिअसपर्यंत राहील, असा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. किमान तापमानात गुरुवारी (ता. 30) किमान 4 ते 5 अंशाची घट होण्याची शक्‍यता आहे. त्याची चाहूल बुधवारपासूनच लागली. मुंबईत बुधवारी दिवसभर गारवा होता.
 
हेही वाचा : भिवंडी-कल्याण मेट्रोच्या मार्गात बदल होण्याची शक्यता?

या परिस्थितीमुळे यंदा देशभरात हिवाळा लांबण्याची शक्‍यता केंद्रीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबईत 1 फेब्रुवारीपर्यंत गारठा राहणार आहे. हवेच्या प्रवाहातील बदलामुळे पुन्हा थंडी सुरू झाली आहे. यावर्षीचे सर्वात कमी 15.4 अंश सेल्सिअस तापमान 17 जानेवारीला नोंदवण्यात आले होते. त्याच दिवशी कमाल तापमानही (25.3) गेल्या दशकातील सर्वात कमी होते. गुरुवारी किमान तापमान 14 अंशापर्यंत येण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा : चालत्या बोटीच्या इंजिनमध्ये पडला चिमुकला 

कुलाबा येथे कमाल 26.5 आणि किमान 20 अंश तर सांताक्रूझ येथे कमाल 26.8 आणि किमान 19.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. पवई येथे 16.32 आणि पनवेल येथे 16.90 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबईत साधारण 15 जानेवारीनंतर तापमान वाढू शकते; मात्र यंदा गेल्या चार दिवसांपासून तापमानात घट होऊ लागली आहे. शहरात साधारण 15 अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान गुलाबी थंडी मानली जाते. 

हेही वाचा : चीनची आणखी एक वाहन कंपनी भारतात धुमाकूळ घालणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Housing Lottery: सामान्यांचं घरकुलाचं स्वप्न पूर्ण होणार! पुणे गृहनिर्माण मंडळाची ४१८६ घरांची ऑनलाईन सोडत, अर्ज कसा करायचा?

Omerga News : ढगफुटीमुळे आलूर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; वाहतूक ठप्प

Latest Marathi News Updates Live : म्हाडा कोकण मंडळातर्फे 71 अनिवासी गाळे विक्रीसाठी लिलावाकरिता ऑनलाईन नोंदणी अर्ज प्रक्रियेला प्रारंभ

Onion Price Crisis : कांद्याला योग्य भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी पुकारले ‘फोन आंदोलन’!

'एक काळ असा होता जेव्हा बाबा स्टेशनवर झोपायचे' ललित प्रभाकरने सांगितलं कुटुंबाचा खडतर प्रवास, म्हणाला,'आई बाबा शेतकरी...'

SCROLL FOR NEXT