Mumbai road  file photo
मुंबई

मुंबईत यापुढे वाहनांसाठी कलर कोड

स्टिकर बाबतचे नियम काय आहेत?

अनिश पाटील, प्रतिनिधी

मुंबई: राज्यात कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये मोठ्याप्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. पण त्यानंतरही मुंबईतील रस्त्यावर विनाकारण फिरणा-यांची संख्या लक्षात घेता पोलिसांकडून गाड्यांना वेगवेगळ्या रंगाचे कोड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील गाड्यांना लाल, हिरवा व पिवळ्या रंगाचे स्टीकर लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यापुढे आता मुंबईत खाजगी वाहनांवर 3 प्रकारचे कलर कोड लागणार आहेत. कलम 144 नुसार मुंबई शहरात फक्त विशिष्ट कलर कोडचे स्टीकर लावणे बंधनकारक आहे. 18 एप्रिल सकाळी सात वाजल्यापासून एक मेपर्यंत हे स्टीकर लावणे बंधनकारक आहे. हे स्टीकर वाहनांच्या मालकांनी स्वतः लावायचे आहेत. याशिवाय पोलिसही विविध ठिकाणी अशा स्टीकरचे वितरण करणार आहेत. सहा इंचाचे स्टीकर गोल आकारात गाडीला चिकटवायचे आहेत.

वैद्यकीय सेवा देणाऱ्या वाहनांना लाल कलर कोड. त्यात डॉक्टर, रुग्णालय, रुग्णवाहिका, वैद्यकीय वस्तू पुरवठा करणा-यांनी लाल रंगाचे स्टीकर लावणे बंधनकारक आहे. याशिवाय महापालिका कर्मचारी, सरकारी कर्मचारी, पत्रकार, पाणी पुरवठा, गॅस सेवा, टेलिफोन सेवा आदींना पिवळे कलर कोड आणि भाज्या, फळे, दुध, बेकरी , खाद्यपदार्थ यांच्याशी संबंधीत वाहनांना हिरवे कलर कोड अशी संकल्पना मुंबई पोलिसांनी समोर आणली आहे.

मुंबईतील सध्या वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता मुंबईत विविध निर्बंध आणि कडक नियम लावणे गरजेचे आहे. पण या घोषणेनंतर नागरीकांमध्ये मात्र संभ्रमावस्थेत पहायला मिळाले. मात्र या निर्णयामुळे विनाकारण फिरणा-यांवर किती आळा बसेल हा येणारा काळच ठरवेल.

गर्दीच्या ठिकाणांची माहिती घेण्यास सुरूवात

मुंबईतील विविध ठिकाणी लॉकडाऊनंतरही अनेक ठीकाणी नागरीक गर्दी करत आहेत. अशा ठिकाणांची माहिती घेतली जात असून अशा ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे.

स्टिकर बाबतचे नियम काय आहेत?

चार चाकी गाड्यांच्या पुढच्या व मागच्या दोन्ही स्क्रीन(काचेवर) हे स्टीकर दर्शनीय ठिकाणी चिकटवायचे आहेत. तर दुचाकी स्वारांनाही हे स्टीकर बसवणे बंधनकारक आहे. त्यांनीही दुचाकीच्या पुढील व मागील बाजूच्या दर्शनीय ठिकाणी हे विविध कलर कोडचे स्टीकर चिकटवायचे आहेत. हे स्टीकर सहा इंच व्यासाचे गोल असावे. स्टीकरशिवाय गाडी चालवणे मुंबईत यापुढे प्रतिबंधीत असेल, तसेच स्टीकरचा गैरवापर केल्यास तोतयागिरी केल्याबाबत गुन्हाही दाखल होऊ शकतो. याबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त चैतन्य एस. यांनी शनिवारी जारी केले आहेत. कलम 144 अंतर्गत हे आदेश जारी करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी स्वतः व्हिडिओ जारी करून या नव्या कलर कोडबद्दल माहिती दिली.

(संपादन - दीनानाथ परब)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT