मुंबई

कोरोनाविरोधातील लढाईसाठी आमदारानेच घेतले प्रशिक्षण! 

सकाळवृत्तसेवा

विरार : कोरोनाविरुद्धचा लढा आता तीव्र झाला आहे. कोरोना विरोधात लढण्यासाठी सर्वच जण काहीना काही प्रयत्न करीत आहेत. आमदार क्षितिज ठाकूर यांनीदेखील पद्धतशीरपणे जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आरोग्य आणीबाणी कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेतले आहे. 

हे वाचलं का? : कोरोनाच्या लढ्यात उद्धव-राज `साथ-साथ`

कोरोनाचा प्रसार वसई-विरार भागांमध्ये होऊ नये, यासाठी बहुजन विकास आघाडीतर्फे वेगवेगळ्या पातळीवर काम सुरू आहे. पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या परिवहन विभागाच्या बसगाड्यांचे निर्जंतुकीकरण, रेल्वे फलाटांचे निर्जंतुकीकरण, गरजूंना मोफत अन्नधान्य वाटप आदी उपक्रम बहुजन विकास आघाडी राबवत आहे. कोरोनाविषाणूबद्दल योग्य माहिती घेऊन नागरिकांना सजग करण्यासाठी आमदार क्षितिज यांनी थेट जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला. 

महत्त्वाचे : हे म्हणतात, आंब्याच्या वाहतुकीसाठी एसटी बसचा वापर करा!

जागतिक आरोग्य संघटनेतर्फे कोविड-19 कार्यकारी नियोजनाची मार्गदर्शक तत्त्वे आणि कोविड-19 विरोधी लढा देण्यासाठी देशाची तयारी, या मुद्द्यांवर प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात एखाद्या साथीला सामोरे जाताना नागरिकांचा प्रतिसाद कसा असला पाहिजे, याची आठ अंगांनी माहिती देण्यात आली. ती मिळवण्यासाठी क्षितिज यांनी पुढाकार घेतला. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यक्रमात खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. फक्त कोरोनाच्या साथीपुरताच नाही, तर इतर वेळीही यातील अनेक गोष्टींचा फायदा करून घेता येईल. अशा प्रकारच्या महामारीचा सामना करण्यासाठी देश, राज्य, शहर, जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर काय करायला हवे, याचे मार्गदर्शन मिळाले. 
- क्षितिज ठाकूर, आमदार, नालासोपारा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोशल मीडियाचा निष्पक्ष न्यायप्रक्रियेला धोका; सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण; व्यक्त केली गंभीर चिंता, काय म्हणाले?

Mumbai Indians: इस बार NO. 6... ! हिटमॅनच्या हातात माईक अन् हार्दिक-सूर्यासह फुंकले IPL 2026 साठी रणशिंग; Video Viral

Pune Crime: चाेरट्यांचा तब्बल २८ तोळे सोन्यावर डल्ला; आंबेगाव तालुक्यातील घटना, घरात काेणी नसल्याने साधला डाव!

Ayurvedic Tips for Oral Health: आयुर्वेदात सांगितलेल्या या सवयी फक्त दाताचं आरोग्यच नाही, तर पचनही परफेक्ट करतात; आजच फॉलो करा

Satara ZP: कायद्याचे रक्षक की सत्तेचे साधक! सातारा झेडपी अध्‍यक्ष निवडीवेळी झालेल्‍या ‘पाॅवर प्‍ले’चे पडसाद; पोलिसांच्या भूमिकेवर संशय..

SCROLL FOR NEXT