covid thane 
मुंबई

कोव्हिडची सेवा देताना कोरोना झाल्यास भरपगारी रजा, ठाणे महापौरांची पालिका प्रशासनाला सूचना

राजेश मोरे

ठाणे : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात महापालिकेचे काम करीत असताना अनेक कर्मचाऱ्यांना कोरोना झाला. या काळात कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना कोरोना झाला असल्याने त्यांना या सुट्टीच्या कालावधीत भर पगारी रजा द्यावी अशी सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. 

कोव्हिड-19 प्रतिबंधासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सर्वोतोपरी उपाय योजना केल्या जात असताना महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने अथक परिश्रम घेत आहेत. कोरोना विरोधातील ही लढाई संपूर्ण क्षमतेने लढली जात असताना काही अधिकारी व कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने काही रुग्णांना रुग्णालयात तसेच काही रुग्णांना महानगरपालिकेने दाखल केलेल्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तसेच काही रुग्णांना घरीच विलगीकरण करुन राहण्यासाठी सुचित करण्यात आले आहे.

अशा प्रकारे कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन कोरोनाबाधित झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील तसेच कंत्राटी मानधनावरील अधिकारी व कर्मचारी यांची या कालावधीतील अनुपस्थिती ही गैरहजेरी न धरता "कर्तव्य कालावधी" म्हणून मानण्यात यावा. यामध्ये कोणत्याही प्रकारचा रजेचा अर्ज घेण्यात येऊ नये व त्यांच्या वेतनात कोणतीही कपात न करता त्यांना संपूर्ण वेतन अदा करण्यात यावे, अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना महापौरांनी केली आहे. अशाप्रकारे कार्यवाही केल्यास अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन मिळून जोमाने कामे करतील आणि कोरोनाचा सामना सक्षमतेने होईल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे. 

(संपादन : वैभव गाटे)

compensation leave in case of corona while serving covid Thane mayor

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘NO REFUND, NO EXCHANGE’ बोर्ड लावला म्हणून पैसे परत मिळणार नाहीत? वस्तूमध्ये प्रॉब्लेम आल्यास ग्राहक काय करू शकतो? पाहा

Ram Temple Staff Verification : राम मंदिरातील कर्मचाऱ्यांचे चारित्र्य तपासणार अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचा मोठा निर्णय

Drishyam 3 Collection: विजय साळगावकरची जादू पुन्हा चालली! ‘दृश्यम 3’ची बंपर ओपनिंग, पहिल्याच दिवशी तब्बल 'इतक्या' कोटींचा गल्ला

ESIC Medical College : हरिद्वारमध्ये ESIC मेडिकल कॉलेजला मंजुरी; प्रत्येक बॅचमध्ये ५० MBBS विद्यार्थ्यांना प्रवेश

Ladki Bahin Yojana 1800 Viral Claim : लाडकी बहीण योजनेत मिळणार 1800 रुपये? सोशल मीडियावरील 'तो' दावा दिशाभूल करणारा; DGIPR कडून फॅक्टचेक

SCROLL FOR NEXT