मुंबई

किशोरी पेडणेकर आणि अनिल परब यांच्या अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार दाखल

राजू परुळेकर

मुंबईः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलिसांच्याबाबत अपमानकारक शब्दप्रयोग करणाऱ्या कंगणाच्या कार्यालयावर मुंबई पालिकेने हातोडा मारला. त्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बांद्रा निर्मलनागर पोलिस ठाण्यात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्याचे मंत्री अनिल परब यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. 

किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी अनधिकृत बांधकाम करून भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच त्यांच्यावर भादवी 420, 468, 467, 471 नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र ठाकरे सरकारच्या दबावामुळे पोलिस कारवाई करत नसल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. 

सोमय्या यांनी आपल्या आरोपात महापौर यांच्या किश कार्पोरेट सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून झोपडपट्टीवासियांचे गेले लाटून भ्रष्ट्राचार केल्याचं म्हटलं आहे. महापौरांनी बनावट कागदपत्र बनवून गोमाता जनता एसआरए मधील जागा बळकावली आहे. रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडे महापुरांच्या कुटुंबियांनी बनावट दस्तद्वारे खोटे डिक्लेरेशन केले. तर अनिल परब यांनी सरकारी वसाहत गांधीनगर येथे बिल्डिंग नं 57 आणि 58 मध्ये म्हाडाच्या मोकळ्या जागेवर कब्जा केला असून वातानुकूलित कार्यालय थाटले असून 2 हजार फुटांचे बांधकामही केल्याचा दावा करण्यात आलेला आहे. 

मुंबई महापौर आणि राज्याचे मंत्री यांनी केलेल्या गैरकारभाराच्या विरोधात निर्मलनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. मात्र ठाकरे सरकारच्या दबावामुळे पोलिस कारवाई करत नसल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे.

या संदर्भात निर्मल नगर पोलिस स्टेशनमध्ये किरीट सोमय्या यांनी आज तक्रार अर्ज दिला असल्याचं वरिष्ठ पोलिस निरीक्षक भंडारे यांनी चौकशी करून पुढील तपास करीत आहे.

-------------------

(संपादनः पूजा विचारे)

 Complaint filed against Kishori Pednekar Anil Parab regarding unauthorized construction

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

ISRO Cyclone Warning: माॅन्सूनच्या परतीनंतर चक्रीवादळांचा धोका: ‘इस्रो’चा इशारा; ४४ वर्षांतील मोठा तडाखा शक्य

SCROLL FOR NEXT