मुंबई

ऑटोमोबाईल, गॅरेज कामगारांच्या अर्थचक्राला ब्रेक! जगणं झालं मुश्किल

उत्कर्षा पाटील

मुंबई: दोन महिन्यांपासून गॅरेज, सर्व्हिस सेंटर बंद आहेत. त्याशिवाय उत्पन्नाचे कोणतेच साधन उपलब्ध नाही. जवळचे पैसेही आता संपलेत. कसेबसे मालकाकडून व इतरांकडून अन्न धान्य उधारीवर घेऊन दिवस पुढे ढकलत आहेत. आणखी किती दिवस असा  संसाराचा गाढा रेटायचा, असे प्रश्न गॅरेजमध्ये काम करणारे मेकॅनिक व हेल्पर कामगारांना पडला आहे. या व्यवसायातील अनेक कामगार परराज्यातून येतात. त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. 

गॅरेज, मेकॅनिकच्या धंद्यात फार फार पुढील एक, दोन महिन्याचे नियोजन असते. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांचा घरखर्च चालतो. लॉकडाऊन सुरू होऊन आता दोन महिने होत आल्यामुळे या कामगारांची आबाळ होत आहे. सध्या मालकाकडून किंवा अन्य संस्थांकडून अन्न धान्य मिळते. त्यावर त्यांचा कसा बसा गुजराण होत आहे; मात्र आता स्वतःकडीलही पैसे संपले. घरातील आजारी व्यक्तीच्या औषध पाण्यासाठी पैसे कुठून आणायचे, या संकटाला तोंड कसे द्याचे, असे बिकट प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत. 
डोंबिवलीचे आर एस ए ऑटोमोबाईल आय केअर सर्व्हिसेचे सागर जोशी म्हणाले, लॉकडाऊनमध्ये ऑटो मोबाईल व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांचे खूप हाल होत आहेत. हे कामगार रोजंदारीवर काम करत असल्याने त्यांच्यामध्ये पैसे साठवून ठेवण्याचे प्रमाण खूप कमी आहे; मात्र या काळात काही गॅरेज मालक बेसिक खर्चासाठी कामगारांना पैसे देत आहे. पूर्ण पगार ते देऊ शकत नाहीत. सर्वांचीच परिस्थिती आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही, असे सागर यांनी सांगितले. 

ऑटो मोबाईल व्यवसायात 50 ते 60 टक्के कामगार मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कार पेंट करणारे पेंटर ओडिसा , केरळ येथून आलेले आहेत. ते सध्या येथेच अडकून पडले आहेत. जिथे आश्रय मिळेल तेथे ते सध्या राहत आहेत. हे कामगार त्यांना मिळणारे पैसेआपल्या गावी कुटूंबाला पाठवतात. त्यावर त्यांचे घर चालते; मात्र दोन महिन्यापासून सर्व ठप्प आहे. त्यांना घरी पैसे पाठवता आले नाही. गावाकडील कुटुंब कसे गुजराण करत असेल या चिंतेत ते घरी जाण्याची प्रतिक्षा करत आहेत. 

आर एस ए ऑटोमोबाईल आय केअर सर्व्हिसेने सर्व राज्यातील मेकॅनिक व गॅरेजचे जाळे विणले आहे. अडचणीत सापडलेल्या गॅरेज कामगारांसाठी आम्ही 7498102102 या क्रमांकावर हेल्पलाईन सेवा सुरु केली आहे. रोज 10 ते 20 फोन येतात. साहेब आमच्या जवळचे पैसे संपले. आता पुढे कसे करायचे?, असे प्रश्न ते विचारतात. आमच्या कंपनीकडून त्यांना अन्न धान्य पाठवण्याची सोय केली आहे. त्यामुळे त्यांना तेवढा आधार मिळतो. पण आताची  परिस्थिती बिकट आहे. लॉकडाऊन संपल्यावर व्यवस्थित रोजगार उपलब्ध होईल. कारण सुरक्षेच्या दृष्टीने लोक स्वतःच्या वाहनातून प्रवास करण्यास प्राधान्य देतील. 
- सागर जोशी, आर एस ए ऑटोमोबाईल आय केअर सर्व्हिस


मी वरळी कोळीवाड्यात राहतो. आमचा परिसर सील आहे. कुठे जाता येत नाही. दादरला छोटे गॅरेज आहे. गेले दीड महिना ते बंद आहे. घरची आर्थिक स्थिती पूर्णतः ढासळत आहे. घरात वडिल, पत्नी, दोन मुली, भाऊ त्याचे कुटूंब असे सात लोक राहतात. घरखर्च कसा चालवायचा ? कसे बसे उधारीवर घर चालवत आहोत; मात्र आता सर्वांकडील पैसे संपले आहेत. त्यामुळे मदत मिळणेही कठिण आहे. रेशनचे धान्यही अजून मिळाले नाही. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे 
- रवींद्र आंबेरकर, गॅरेज कामगार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nice Dp! पत्नीला मित्राचा मेसेज आला अन् पतीने गळा आवळून जीवघेणा हल्ला केला; धक्कादायक घटना समोर...

Solapur Accident: देवदर्शन अन् काळाचा घाला ! 'बल्करच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार'; अक्कलकोट रोडवरील घटना..

Latest Marathi News Live Update : बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनात सहभागी असलेल्या नेत्यांवर गुन्हा दाखल, हिंगणा पोलिसांची कारवाई

Bribery Action:'बिल काढण्यासाठी लाच मागणारा विस्ताराधिकारी जाळ्यात'; साेलापुरात खळबळ, दोन हजार घेताना सापडला..

Sasapde Murder Case: धक्कादायक! 'सासपडे येथील नराधमाकडून आणखी एका खुनाची कबुली'; सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ..

SCROLL FOR NEXT