जनतेची दिशाभूल करू नका; त्यांच्या मनातील शंका दूर करा  
मुंबई

जनतेची दिशाभूल करू नका; त्यांच्या मनातील शंका दूर करा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रेल्वेची तिकिट विक्री सुरू नसताना मजूरांकडून पैसे कोण घेत आहे? ही जनतेच्या मनातील शंका दूर करा, असे आवाहन भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना केले आहे. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी एक चित्रफित प्रसिद्ध करून केंद्र सरकारवर टीका करत, कामगारांकडून तिकिटाचे पैसे घेऊ नयेत अशी मागणी केली. या संदर्भात माधव भांडारी म्हणाले की, देशमुख जनतेची दिशाभूल करत आहेत. लॉकडाऊनमुळे रेल्वेगाड्यांची प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्यावरून रेल्वे मंत्रालय ठिकठिकाणी अडकलेल्या मजूरांसाठी विशेष श्रमिक ट्रेन चालवत आहे. मात्र, रेल्वे तिकीट विक्री करत नसल्यामुळे मजूरांकडून पैसे घेण्याचा मुद्दाच उद्भवत नाही. रेल्वे केवळ राज्य सरकारच्या मागणीनुसार गाडी सोडण्याची व्यवस्था करते. प्रवाशांची यादी अंतिम करण्याचे काम राज्य सरकारचे आहे. राज्य सरकारने यादी करून दिलेल्या प्रवाशांना रेल्वे गाडीतून घेऊन जाते. संबंधित प्रवाशांची कागदपत्रे तपासून खातरजमा करण्याचे काम देखील राज्य सरकारची यंत्रणा करते. रेल्वेचा या सर्व विषयात प्रवाशाशी थेट संबंध येतच नाही. त्यामुळे मजुरांकडे कोणी पैसे मागत असेल तर त्याची जबाबदारी पूर्णपणे राज्य सरकारची आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच या मुद्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी भांडारी यांनी केली आहे. 

ही बातमी वाचली का? अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली पासची खैरात; प्रशासकिय कारभार चव्हाट्यावर 

केंद्र सरकारकडून विशेष रेल्वेगाड्या त्या-त्या राज्य सरकारच्या मागणीनुसार चालवल्या जात आहे. अशा गाडीच्या एकूण खर्चाचा 85% भार रेल्वे उचलत असून, केवळ 15% राज्य सरकारने उचलावा. अशी या गाड्यांची व्यवस्था आहे. देशातल्या सर्व राज्यांनी या व्यवस्थेला मान्यता दिलेली आहे. असे असताना रेल्वेने मजुरांकडे तिकिटाचे पैसे मागितले असे म्हणणे पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे. असेही माधव भांडारी यावेळी म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

श्रेयस तळपदेचं घर पाहिलंत का? भलीमोठी बाल्कनी अन् ५० वर्ष जुनी भांडी, पाहा आतले सुंदर फोटो!

Latest Marathi News Live Update : अनंत अंबानी यांनी छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामला भेट दिली

Aashadhi Wari: आषाढी वारीसाठी आळंदी सज्ज! दोन दिवसांत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश; वारीपूर्व तयारीला अंतिम वेग

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

SCROLL FOR NEXT