Mumbai-Ahmedabad National Highway esakal
मुंबई

'या' महामार्गावर चार महिन्यात 12 ठार तर, 28 जण जखमी; काँग्रेसने आंदोलन करत खानिवडे टोलनाका पाडला बंद

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway) गेल्या चार महिन्यांपासून सीमांत काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे.

संदीप पंडित

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या चार महिन्यात १२ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास २८ जण गंभीर जखमी झाले आहेत.

विरार : चार महिन्यापासून रेंगाळत सुरु असलेले काँक्रिटीकरण, महामार्गावर होत असलेले अपघात, त्याचबरोबर वारंवार खचणारा महामार्ग आणि रस्त्याच्या कामामुळं होणारी वाहतूक कोंडी या विरोधात आज काँग्रेसचे (Congress) प्रदेश पर्यावरण विभागाचे अध्यक्ष समीर वर्तक यांच्या नेतृत्वाखाली खानिवडा टोलनाका बंद पाडण्यात आला. याबाबत महामार्गावरील ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणाच्या (Highway Authority) अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway) गेल्या चार महिन्यांपासून सीमांत काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. परंतु, या कामामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच डांबरी रस्ता व्यवस्थित असताना ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी हे काम सुरु केल्याचा आरोप वर्तक यांनी केला असून हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचाही आरोप त्यांनी केला.

या महामार्गावर गेल्या चार महिन्यात १२ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास २८ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असे पत्र चार पोलीस ठाण्यात देण्यात आले होते. तर, आज सकाळी खानिवडे येथील टोलनाका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बंद पडल्याने काही काळ येथील वातावरण तणावपूर्ण झाले होते. जो पर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत आपण मागे हटणार नाही, असा पवित्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतला होता.

यावेळी समीर वर्तक, टोनी डाबरे, अमर पटेल, डेरिक फुर्ट्याडो, टायस फर्नांडिस, अभिजित घाग, निझाम खान उपस्थित होते. या आंदोलनाच्या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाचे ठाण्यातील अधिकारी सुहास चिटणीस यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. दरम्यान, महामार्गावरील अपघातात जीव गेलेल्या नातेवाईकांना घेऊन वर्तक यांनी मांडवी पोलीस ठाण्यात ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाची तक्रार दाखल केलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT