मुंबई

या परिसरात घर घेताना विचार करा!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : खारघर-तळोजामधील हवेचा दर्जा अतिशय सुमार असल्याचे केटीसी वेल्फेअर असोसिएशनच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. असोसिएशनने केलेल्या अहवालात पहाटेच्या वेळी हवा प्रदूषित असते, असा अहवाल खारघर तळोजा वेल्फेअर असोसिएशनकडे प्राप्त झाला आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

खारघर-तळोजा परिसरात तळोजा औद्योगिक वसाहतीत अनेक वर्षांपासून पहाटेच्या वेळी हवेत सोडणाऱ्या वायू प्रदूषणामुळे हवेचा दर्जा खालावला आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यामुळे खारघर आणि तळोजामधील नागरिकांनी अनेक वेळा मोर्चा, आंदोलन केले. एवढेच नाही तर, सीबीडी येथील प्रदूषण महामंडळ आणि पनवेल पालिका प्रशासनाकडे लेखी पत्र देवूनही आश्वासनापलिकडे काही हाती लागले नाही. अखेर खारघर-तळोजा वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश रानवडे, उपाध्यक्ष इम्तियाज शेख आणि सचिव गिरीश दिवेकर यांनी परिसरातील काही इमारतीत वास्तव्य करणाऱ्या सदस्यांना विश्वासात घेवून हवेतील प्रदूषण मोजण्यासाठी प्रदूषण मीटर बसविण्यासाठी जवळपास तीस हजार रुपये खर्च येत असल्याचे सांगितले. तसेच आरोग्याच्या दृष्टीने सोयीचे असल्याचे सांगून प्रत्येकी पाचशे रुपये गोळा करून तीस हजारात प्रदूषण मीटर खरेदी केली. 

प्रदूषण मीटर बसवण्यापुर्वी पुण्यातील प्रदूषण महामंडळाने एका कंपनीबरोबर संपर्क साधत ही प्रक्रिया पूर्ण केली. प्रदूषण मीटरद्वारे प्राप्त झालेल्या हवेची तपासणी केली असता. परिसरातील हवा प्रदुषित असल्याचे समोर आले. 

पहाटेच्या वेळी हवेत पसरणारे प्रदूषण हे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करणारे आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसन रोग, दमा, ह्रदयाचा विकार जडण्याची शक्‍यता आहे. तसेच हे प्रदूषण गर्भवती महिलेसाठी धोकादायक असून प्रदूषण महामंडळ आणि पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले.

अहवालातील पीएम २.५ आणि पीएम १० या निकषांतून हवेचा दर्जा तिप्पट खराब असून हवेमध्ये घातक अशा कार्बन मोनाक्‍साईडचे प्रमाण हे सर्वसाधारण प्रमाणापेक्षा तिप्पट असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय मानवी आरोग्याला घातक असलेल्या एनओ २ चे प्रमाणही खूप मोठे आहे.

खारघर व तळोजा परिसरात हायटेक सेन्सर असलेले प्रदूषण मीटर बसवण्यात आले आहेत. हे प्रदूषण एमपीसीबी ॲन्ड एमओईएफ यांनी मान्यता दिलेल्या पुण्यातील प्रयोगशाळेत तपासले. याबाबतचा अहवाल शनिवारी (ता.२५) प्राप्त झाला. या अहवालात खारघर-तळोजा परिसरातील हवा पहाटेच्या वेळी प्रदूषित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
- मनेश राणावडे, अध्यक्ष, खारघर-तळोजा वेल्फेअर असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT