मुंबई

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे विशेष फेऱ्या चालवणार

प्रशांत कांबळे

मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन नागपूर-दरभंगा, मुंबई-सहरसा, समस्तीपूर आणि पुणे-मुझफ्फरपूरदरम्यान एकेरी दिशेच्या विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 

या सर्व आरक्षित विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग उद्या (ता. 7) सर्व संगणकीय केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. दरम्यान, केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल, तर प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोव्हिड संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल. 

नागपूर-दरभंगा वन वे स्पेशल- 01151 विशेष ट्रेन 9 नोव्हेंबरला नागपूरहून रात्री 3 वाजता सुटेल आणि दरभंगा येथे दुसऱ्या दिवशी 6.55 वाजता पोहचेल. सीएसएमटी-सहरसा एकेरी मार्ग विशेष- 02151 विशेष ट्रेन 9 नोव्हेंबरला सीएसएमटी येथून 10 वाजता सुटेल व सहरसा येथे दुसऱ्या दिवशी रात्री 8.15 वाजता पोहचेल. मुंबई-सहरसा एकेरी मार्ग विशेष- 02153 विशेष ट्रेन 9 नोव्हेंबरला सीएसएमटी येथून दुपारी 2 वाजता सुटेल व सहरसा येथे तिसऱ्या दिवशी रात्री 12.45 वाजता पोहचेल.

पुणे-मुझफ्फरपूर एकेरी मार्ग विशेष- 01153 विशेष ट्रेन 9 नोव्हेंबरला पुणे येथून दुपारी 3.15 वाजता सुटेल व मुझफ्फरपूर येथे तिसऱ्या दिवशी रात्री 3.10 वाजता पोहचेल. सीएसएमटी-समस्तीपूर एकेरी मार्ग विशेष- 02157 विशेष ट्रेन 9 नोव्हेंबरला सीएसएमटी येथून 8.35 वाजता सुटेल व समस्तीपूर येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता पोहचेल. 

Considering the growing crowd of passengers Central Railway will run special rounds 

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

lok sabha result: "उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग..."; लोकसभेच्या निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय घोषित

IPL 2024 Impact Players : इंपॅक्ट खेळाडूच्या नियमाला शास्त्रींचे समर्थन;अनेक सामने अखेरपर्यंत रंगतदार होत असल्याचा दिला दाखला

Google I/O 2024 : जेमिनी 1.5, सर्च एआय अन् बरंच काही.. गुगलच्या इव्हेंटमध्ये काय-काय झालं लाँच? जाणून घ्या

SEBI KYC: कोट्यवधी गुंतवणूकदारांना दिलासा; सेबीने KYC संबंधित नियम केले शिथिल, कोणाला होणार फायदा?

Latest Marathi News Live Update : आज नाशिकमध्ये नरेंद्र मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा

SCROLL FOR NEXT