मुंबई

ताज हॉटेलचे मानावे तेवढे आभार कमीच; पालिका कर्मचाऱ्यांसाठी विनाअट मदतीची तयारी

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे पालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचण्यात अडचणी येत आहेत. प्रवासादरम्यान संबंधित डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचा-यांना संसर्ग होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर 'ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स' सह जवळच्या हॉटेलांमध्ये कामगारांना निवासाची व्यवस्था  देण्याबाबत विनाअट मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे कर्मचा-यांना दिलासा मिळाला आहे.

'गेटवे ऑफ इंडिया' जवळील ताज हॉटेलमध्ये ज्या खोलीसाठी दररोज १० ते १५ हजार रुपये एवढी रक्कम आकारली जाते, त्याच खोलीसाठी दिवसाला दोन व्यक्ती राहण्याच्या बोलीवर महापालिकेने २ हजार एवढी रक्कम देण्याची तयारी दर्शविली. महापालिकेने प्रतिमाणशी प्रतिदिवस रुपये १ हजार असा दर स्वतः  ठरवला. हा दर 'ताज हॉटेल' ने विनाअट स्वीकारला . विशेष म्हणजे या दरात निवास, न्याहारी, दोन्ही वेळचे जेवण व कपडे धुण्याची व्यवस्था आदी बाबींचाही समावेश आहे.

'लाॅक डाऊन' जाहीर झाल्यापासून  महानगरपालिकेच्या काही रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना 'ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स द्वारे स्वतःहून मोफत जेवण पुरविण्यात येत आहे.  वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सेवा देण्यासाठी दूरवरून प्रवास करून यावे लागते. या प्रवासादरम्यान वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी स्वतःहून महापालिका कर्मचाऱ्यांना मदत करण्याची तयारी दर्शविली होती. 
 'ताज हॉटेल'द्वारे स्वीकारण्यात आलेल्या दरांच्या धर्तीवर हॉटेलच्या दर्जानुसार दर निर्धारित करून पालिका क्षेत्रातील इतर हॉटेल्समध्ये देखील रूम 'बुक' करण्याची कार्यवाही करण्यासाठी परिपत्रक काढण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार सहआयुक्त रमेश पवार यांनी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार हॉटेलमधील प्रत्येक खोलीत दोन व्यक्ती राहतील, या पद्धतीने निर्धारित केलेले दर नमूद केले आहेत.

या परिपत्रकान्वये पंचतारांकित हॉटेलसाठी प्रति दिवशी रुपये २ हजार, ४ तारांकित हॉटेलसाठी प्रतिदिन रुपये १ हजार ५००, तीन तारांकित हॉटेल असल्यास दर दिवशी रुपये १ हजार ; तर विना तारांकित हॉटेल असल्यास प्रतिदिवशी रुपये ५०० असा दर निर्धारित करण्यात आला आहे. या रकमेत दोन व्यक्तींच्या निवासासह न्याहारी, दोन्ही वेळचे जेवण व लॉन्ड्री सर्विसचा समावेश आहे. या रकमेत संबंधित करांचा समावेश नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Beed Baby News: मृत घोषित केलेलं बाळ रात्रभर दुर्लक्षित; दुसऱ्या दिवशी बॅगमध्ये टाकून नेलं, कुदळ सापडेना म्हणून झाला उशीर अन्...

तेजश्री प्रधानच्या झी मराठीवर दिसण्यावर स्टार प्रवाहच्या सतीश राजवाडेंची थेट प्रतिक्रिया; म्हणाले, 'ती नायिका आधी...

IND vs ENG 3rd Test: जो रूटचे विक्रमी शतक! भारतासमोर मजबूत भिंतीसारखा राहिलाय उभा; राहुल द्रविड, स्टीव्ह स्मिथचा विक्रम मोडला

SCROLL FOR NEXT