मुंबई

ठरलं तर! धारावी, वरळीचा प्लॅन आता अंधेरी, मुलूंडमध्ये अंमलात आणणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः धारावी आणि वरळीतील कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग कमी केल्यावर तोच फॉर्म्युला आता अंधेरी, मुलुंड, बोरीवली, भांडुप, मालाड, कादिवली, दहीसरमध्ये अमलात आणण्याचे बृहन्मुंबई महापालिकेने ठरवले आहे. 

धारावी आणि वरळीतील झोपडपट्टी तसेच कमालीची दाटीवाटीची वस्ती कोरोना रोखण्याच्या मोहीमेतील डोकेदुखी ठरली होती, पण रुग्ण शोधणे, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे, त्यांची चाचणी करणे आणि त्यांच्यावर उपचार करणे अर्थात ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटिंग हे चार टी प्रभावी ठरले होते. त्यासाठी शीघ्र कृती योजना अमलात आणण्यात आली होती. 
या शीघ्र कृती योजनेअंतर्गत रुग्णवाहिकांचे मोबाईल फिवर क्लिनिक्समध्ये रुंपांतर करण्यात आले. डॉक्टरांचे पथक स्वयंसेवकांच्या मदतीने जास्तीत जास्त लोकांची तपासणी करीत होते. त्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी केली जात होती. या मोहीमेत घरातील प्रत्येकाचे तपमान तपासले जात होते तसेच पल्स ऑक्सीमीटरनेही चाचणी केली जात होती. त्यातून रुग्ण शोधले जात होते.

एखादा रुग्ण मिळाल्यावर त्याच्या संपर्कातील व्यक्तींची जास्त कसून तपासणी केली जात होती. त्याचवेळी रुग्णांचे विलगीकरण कसोशीने केले जात होते. त्यासाठी निवडून आलेले प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, अशासकीय संघटनांची मदत घेण्यात आली होती. आता हीच पद्धत मुंबईतील उपनगरात अमलात येणार आहे. मुंबईच्या उपनगरातील कोरोना साथ रोखण्यासाठी मिशन झिरो सुरु करण्यात आले आहे. त्याअंतर्गत आता जास्त आक्रमकतेने कोरोना रुग्णांचा शोध घेण्यात येईल. त्यासाठी 50 रुग्णवाहिकांचे मोबाईल फिवर क्लिनिक्समध्ये रुपांतरीत करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT